मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन
By वैभव गायकर | Published: August 22, 2022 05:14 PM2022-08-22T17:14:08+5:302022-08-22T17:14:38+5:30
१२ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक सरकारे आली मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागू शकले नाही.
वैभव गायकर
पनवेल - मागील 12 वर्षापासून पूर्ण होऊ न शकलेल्या व सध्याच्या घडीला दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेने दि.22 रोजी पनवेल येथे आंदोलन छेडत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध केला.यावेळी मनसैनिकांनी रस्त्यावरच कोंकणात प्रसिद्ध असलेले बाळ्या नृत्य सादर केले.मनसेच्या रस्ते,साधन सुविधा आस्थापना विभागाच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी , तालुका अध्यक्ष रामदास पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, पनवेल महानगरपालिका शहराध्यक्ष योगेश चिले आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पनवेल कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.12 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे.अनेक सरकारे आली मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागू शकले नाही.आजवर या मार्गावर तब्बल दोन हजार जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला असून जवळपास सात हजारांपेक्षा जास्त नागरिक तसेच वाहन चालक जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेचं अनोखं आंदोलन @mnsadhikrutpic.twitter.com/ZLGAaaBk2D
— Lokmat (@lokmat) August 22, 2022
विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी देखील या मार्गाचे काम पूर्ण करता आले नसल्याने गुडघे टेकले असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांनी केला आहे.गणेशोत्सव तोंडावर आले असताना पुन्हा दरवर्षी प्रमाणे या मार्गावर खड्डे पडल्याने कोंकण वसायींना याचा मोठा फटका बसणारआहे .याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केसरीनाथ पाटील यांनी यावेळी केली.
हे तर दहा तोंडी रावण
मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापाला बनत चालला असताना सरकार असो व अधिकारी वर्ग केवळ आश्वासने आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने मनसेचे खारघर शहर उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी रावणाची विशेभुषा परिधान करून निषेध व्यक्त केला.