- राजू भिसे नागोठणे : अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे. त्यामुळे भातशेती जळून जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्यासह संबंधित शेतकºयांनी केला आहे. संबंधित प्रतिनिधीने या जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले आहे. गळतीमुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. ही वाहिनी शेजारील रिलायन्स कंपनीची असल्याचे स्पष्ट होत असल्याने याबाबत संबंधित अधिकाºयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ न शकल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फुटणाºया या सांडपाणी वाहिनीच्या फुटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.विभागातील शिहू, मुंढाणी, आटिवली, गांधे, चोळे, झोतीरपाडा, तरशेत, जांभुळटेप आदी गावांतील शेतकºयांच्या बहुतांशी जमिनी पूर्व बाजूला असणाºया अंबा नदीलगत आहेत. येथील रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित दूषित पाणी वाहून नेणारी वाहिनी याच भागातून गेली असल्यामुळे ती वारंवार फुटत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कंपनीकडे वारंवार तक्र ार करीत असलो तरी, ते कायम दुर्लक्ष करीत असल्याचे ते सांगतात. पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचत असल्याने हे दूषित पाणी शेतात पसरते आणि नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात.नदीत किंवा खाडीतसुद्धा हे पाणी पसरत असल्यामुळे होणाºया प्रदूषणामुळे मिळणाºया मासळीला रासायनिक दुर्गंधी येत असल्याने मच्छीमार संकटात सापडले असल्याचे मोकल यांचे म्हणणे आहे. मुंढाणी येथील शेतकºयाने सांगितले की, जून महिन्यात भाताची केलेली लागवड या दूषित पाण्यामुळे जळून गेल्यामुळे जुलैच्या अखेरीस दुसºयांदा लागवड केली होती. मात्र, माझे शेताच्या ५० मीटर अंतरावर पुढे ही वाहिनी फुटली असल्यामुळे तिकडच्या शेतातील दूषित पाणी माझ्या शेतात वाहून आल्यामुळे दुसºयांदासुद्धा शेतीची वाट लागली असून, आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल त्यांनी संबंधित प्रतिनिधीकडे व्यक्त केला. वेळोवेळी सांगूनसुद्धा कंपनी आमच्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने सर्व शेतकºयांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे मोकल यांनी या वेळी स्पष्ट केले.
रासायनिक सांडपाण्यामुळे शेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:03 AM