मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:16 AM2019-09-05T02:16:30+5:302019-09-05T02:16:43+5:30

शेतकरी चिंतेत : एका दिवसात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद

The agriculture in Murud taluka is under water | मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

Next

मुरुड : तालुक्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसात १८५ मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. तहसील कार्यालयामार्फत बुधवारी सकाळी आठ वाजता पाऊस मोजण्यात आला, त्यावेळी सर्वात विक्रमी पाऊस मुरुड तालुक्यात पडला असल्याचे कळवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात आतापर्यंत ३२९९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. बघता बघता पावसाने तीन हजारचा टप्पा पार केला आहे. बुधवारी पावसाचा जोर कायम असून शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आलेले सर्व भात पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचले होते. बाजारपेठ, आझाद चौक, अंजुमन हायस्कूल, गोलबंगला व अन्य ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.गणपती उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक खरेदी करण्यासाठी बाजारात आले असता मुसळधार पावसाने ते गावात जाण्यासाठी अडकून पडले होते. दीड दिवसाचे गणपती विसर्जन हे सुद्धा पावसात भिजत जाऊन करण्यात आले. त्यामुळे पडणाऱ्या या सतत धार पावसाळा स्थानिक जनता हैराण झाली आहे. पाऊस सारखाच सुरु असल्याने पावसाचे पाणी निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शेतामधील पाणी सुद्धा कमी न होता ते वाढतच आहे. कारण पाऊस विश्रांती घेत नसल्याने पाण्याचे प्रमाण वाढतच चालेले आहे. आंबोली धरण दुथडी भरून वाहत आहे. हे धोरण ओव्हरपलो झाले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे.
यंदाच्या या पावसात मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुरुड शहरातील बाजारपेठे भागात तर गटारांची खोदाईच झाली नाही.त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबल्याने रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत.गटार खोदाईचे दरवर्षी लाखो रुपयांचा ठेका काढला जातो परंतु गटारांची खोदाईच बरोबर केली जात नाही. गटारांची खोदाई करत असताना नगरपरिषदेचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने संबंधित ठेकेदाराने काम बरोबर न करता पैसे लाटण्याचे काम के लेअसल्याचा आरोप फकजी यांनी के ला.

मुरुड तालुक्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. परंतु कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. सर्वाना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे. भालगाव मार्गावर एक वृक्ष उन्मळून पडला होता, तो सुद्धा बाजूला हटवण्यात येऊन वाहतूक सुरु केली आहे.
- परीक्षीत पाटील, तहसीलदार

मुरुड भालगाव मार्गे रोहा या रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने येथील वाहतूक ठप्प आहे. आमच्या आगारातून खाजणी पुलापर्यंत बस सुरू आहे.
- युवराज कदम,
आगार प्रमुख,
मुरु ड

Web Title: The agriculture in Murud taluka is under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.