शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

आजी-माजी नगरसेवक रिंगणात

By admin | Published: May 14, 2017 10:48 PM

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन

मयूर तांबडे । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन लोकप्रतिनिधी निवडणूक लढवत आहेत. काही प्रभागांत दोन विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने त्यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे. २९ गावांचा समावेश महापालिकेत झाल्याने काही प्रभागात जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य देखील महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात जवळपास २८ ते ३० आजी-माजी नगरसेवक उतरले आहेत. पूर्वी पनवेल नगरपालिकेत दहा प्रभागात ३८ नगरसेवक व ४ स्वीकृत असे ४२ नगरसेवक होते. नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्याने व आजूबाजूच्या २९ गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने नवीन प्रभाग रचनेनुसार आता महापालिकेचे वीस प्रभाग झाले आहेत. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात या वेळी तब्बल २८ हून अधिक आजी-माजी नगरसेवक उतरले आहेत. मागील निवडणुकीत आरक्षणामुळे तर काहींचे पत्ते पक्षाकडून कापले गेल्यामुळे त्यांची नगरसेवक बनण्याची संधी हुकली होती. परंतु आता नव्या प्रभाग आरक्षणामुळे तसेच भाजपा व शिवसेना यांची युती न झाल्यामुळे अनेकांना संधी मिळाली आहे. तर शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीझाल्यामुळे अनेक आजी- माजी नगरसेवकांना निवडणूक लढण्यास मिळाली नाही.महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास २८ आजी-माजी नगरसेवकांनी उडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शेकाप, शिवसेना, भाजपा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांकडून माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवकांवर मतदार पुन्हा एकदा विश्वास दाखवून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतील, असा विश्वास पक्षाच्या प्रमुखांना वाटत आहे. नगरसेवक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या रिंगणात असून माजी नगरसेवकांसह माजी नगराध्यक्ष देखील आपले नशीब आजमावत आहेत. यात संदीप पाटील, चारु शीला घरत यांचा समावेश आहे. प्रभाग २० मधून माजी नगरसेवक पती, पत्नी आपले नशीब पुन्हा आजमावत आहेत. महापालिका निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पाचही पक्षांसह छोटे-मोठे पक्ष देखील स्वतंत्र निवडणुकीत उतरल्यामुळे विद्यमानांसह माजी नगरसेवकांना तिकिटासाठी फारसे झगडावे लागले नाही. पक्ष बदलला तरीही कुणा न कुणा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. अपवाद वगळता बहुतांशांना तिकीट मिळाले आहे त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांनी स्वत: होऊन या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रभागांच्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांच्या कारकिर्दीला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे, तर काही माजी नगरसेवक या महापालिकेच्या निवडणुकीत कमबॅक करत आहेत.