लोकमत न्यूज नेटवर्कपाली : राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा बसावा म्हणून सर्वाेच्च न्यायालयाने महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने, परमिट रूम, हॉटेल यांच्यावर बंदी आणल्याने काही मद्य विक्रेत्यांवर व त्यावर पूरक असलेल्या व्यवसायावर, तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाने देशी-विदेशी दारू विक्र ीतून मिळणारा महसूल बंद झाल्याने शासनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य उद्देश होता की या महामार्गावरील मद्य विक्र ी बंद केल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल, परंतु नेमकी याच्या उलट परिस्थिती झाली आहे. या मार्गावरती सध्या मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या व चढ्या भावाने मद्य विक्र ी होत असून यात शासनाला महसूल मिळत नाहीच, उलट याचा भार मद्यपींवर पडत आहे.नव्याने या व्यवसायात उतरलेल्या विक्रे त्यांनी आपल्या घरातील दागिने विकून व बँकांकडून कर्ज घेवून दुकाने सुरु केली होती. मात्र शासन निर्णयाप्रमाणे त्यांना लागलीच आपली दुकाने बंद करावी लागल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली असल्याचे वक्तव्य रायगड जिल्हा लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मापार यांनी केले. पाली येथील झाप येथे नुकत्याच झालेल्या देशी- विदेशी मद्य विक्रे त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी रायगड जिल्ह्यातील जवळपास ३००वाईन शॉप, बीअर शॉपी, परमिट रूम, हॉटेलचे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, ३१ मार्च २०१७ च्या शासन निर्णयाने मद्य विक्रे त्यांवर अन्यायच केला असून या निर्णयाविरोधात आम्ही देखील कायद्याच्या चौकटीत राहून शासन निर्णयाविरोधात लढा उभारणार असल्याचे सांगितले. याच बैठकीत रायगड जिल्हा लिकर असोसिएशनची स्थापना करून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा लिकर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पाली येथील राजेश मपारा यांची तर उपाध्यक्षपदी सुनील कोतकर आणि प्रवीण राऊत यांची निवड केली असून संपूर्ण रायगडमध्ये तालुका प्रतिनिधी नेमण्यात आले.- आम्ही नुकताच मद्य विक्र ी व्यवसाय सुरू केला होता. आम्ही घरातील गृहिणींचे दागिने विकून व बँकांमधून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. शासनाच्या या अचानक काढलेल्या निर्णयामुळे आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया माणगाव येथील मद्यविक्रे ते वीरेश रामभाऊ येरु णकर आणि मुरुड येथील नंदकुमार महादेव वाघ यांनी दिली आहे.
मद्य विक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: June 17, 2017 1:48 AM