शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात चार नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:52 AM

पावसाचा धुमाकू ळ : अंबा नदीचे पाणी पाली-वाकण पुलावर आल्याने वाहतूक बंद; उंच लाटांमुळे समुद्राचे पाणी शिरले घरात

अलिबाग : जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. आंबा नदीचे पाणी पाली-वाकण पुलावर आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. समुद्रामध्ये सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्याने समुद्रकिनारी असणाºया घरांना समुद्राच्या पाण्याचा फटका बसला. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागच्या सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारीही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली होती. सोसाट्याच्या वाºयासह पाऊस पडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले , त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पाताळगंगा या नद्यांनी दुपारपर्यंत इशारा पातळी गाठली होती. पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. अंबा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाली-वाकण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशा धोकादायक परिस्थितीमध्ये पुलाचा वापर कोणी करू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने सुरू होती. समुद्राला आलेल्या उधाणामुळे चार मीटरच्या लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्राचे पाणी समुद्रकिनारी असणाºया नागरी वस्त्यांमध्ये घुसले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळीपाली : सुधागडात पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली असून, सोमवारी रात्रीपासून तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास तालुक्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नदीवर असलेला पाली पूल पाण्याखाली गेल्याने वाकण-खोपोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.पाली येथे सकाळी शाळा, कॉलेजमध्ये व कामानिमित्त आलेले विद्यार्थी व नागरिक ठिकठिकाणी अडकून रहिल्याने त्यांचे खूपच हाल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ पालीचे तहसीलदार जांभूळपाडा व पाली विभागातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता गेले. पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात के ला होता.पाली येथील अंबा नदीवर लवकरात लवकरच अधिक उंचीचा नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. हा पूल झाल्यावरच प्रवाशांची कायमच्या अडचणीतून सुटका होईल.- मंगेश भगत, अध्यक्ष, मिनीडोर चालक-मालक संघटना, सुधागडपेणमध्ये भातशेती दुसऱ्यांदा पाण्याखालीच्पेण : येथे बुधवार, २४ जुलैपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेले पाच ते सहा दिवस संततधार पावसामुळे पेणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सहा दिवसांत तब्बल ११४३.३ मि.मी. पाऊस पडला असून रविवारी थोडीशी उसंत घेतलेल्या पावसाने परत वक्रदृष्टी करून सोमवार, मंगळवार असे दोन दिवस पेणला झोडपून काढले आहे.च्मंगळवारी जोरदार पाऊस पडत असून, पुन्हा एकदा पूरपरिस्थिती उद्भवल्याने लागवड केलेली ६५०० हेक्टर क्षेत्रावरील भातशेती दुसºयांदा पाण्याखाली आली आहे. शेतीच्या बांधावर जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असलेले शेतकरी या पूरपरिस्थितीमुळे चिंताग्रस्त होऊनसंकटात सापडले आहेत. मंगळवारी १२०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.च्बुधवारी दीप आमावस्या असल्यामुळे समुद्राला मोठी उधाण भरती येणार असल्याने पाऊस असाच पडत राहिला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी तुंबलेल्या नद्या, नाले, ओढे यांची पाण्याची पातळी वाढून मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. पुढचे दोन दिवस समुद्रात मोठी उधाण भरती येणार असल्याने या पावसामुळे पडलेल्या पावसाचे पाणी समुद्राला आलेल्या उधाण भरतीचे पाणी, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.च्पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुधवारी दिवसभर सोसाट्याच्या वाºयांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजची उधाण भरती व उद्याच्या उधाण भरतीच्या वेळेस पाऊस थांबला नाही तर मात्र पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी लवकर न ओसरल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RaigadरायगडDamधरणRainपाऊस