अलिबाग समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:42 PM2020-12-12T14:42:10+5:302020-12-12T14:43:46+5:30
पुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 12 डिसेंबर राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती सुरू हाेती.
रायगड - अलिबागच्या समुद्रामध्ये बुडणार्या पर्यटकाला वाचविण्यात येथील जीवरक्षकांना यश आले. प्रविण क्षीरसागर (25) असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 12 डिसेंबर राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती सुरू हाेती. त्यावेळी प्रवीण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाणयाचा अंदाज न आल्याने ताे बुडू लागला. हे किनाऱ्यावीरल त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने प्रविणला वाचवले. त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढून, तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन प्रविणचे प्राण वाचविले. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रविण हा तरबेज पोहणारा असल्याचे त्याच्या मित्रांकडून समजले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बाेलले जाते