अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:24 AM2018-12-18T05:24:07+5:302018-12-18T05:24:26+5:30

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा ...

In Alibag, the tribal people have been involved in farming | अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

Next

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलत आहे. त्यांनी शेतीमालाच्या व्यवसायात उडी घेऊन समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तरुण पिढीचा शिक्षणाकडील कल आणि इतर समाजाबरोबर आणण्याचा शासनाचा कल या सर्व गोष्टींमुळे अतिगरीब म्हणून ओळखला जाणारा आदिवासी आता बदलताना दिसतो. तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडीवरील अनिल पवार या तरुणाने आतापर्यंत पोट भरण्यासाठी अनेक कष्ट केले. परंतु आता बाजारात उतरून शेतमालाला योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतात भाजी, फळांचे पीक घेऊनरस्त्याच्या कडेला किंवा बाजारात कपडा टाकून विकणे आणि त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार ग्राहकास असणे हे कुठेतरी पवार यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की, शेतीमधील माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो माल बाजारात विक्री करणे. परंतु यासाठी आर्थिक निधी पाहिजे, असल्याने त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या शासकीय योजनेशी संपर्क साधला. त्यानुसार हाशिवरे, वाघोली, नारंगी, चिंचवली या आदिवासीवाडीवरील बांधवांशी भेटून त्याचे महत्त्व पटवून त्यांना एकत्र आणले. जमलेल्या ५०० सदस्यांकडून प्रत्येकी रु. एक हजार मात्र शेअर्स जमा केले. त्याचबरोबर शासकीय अनुदान मिळाले. अशाने डॉ. हार्मन आदिवासी फार्म्स प्रोड्युसर कंपनी, पळी येथे स्थापन केली. या कंपनीचे आदिवासी बंधू-भगिनी संचालक निवडले.
सुरुवातीला कांदा, बटाटा, लसूण, फळे इत्यादी माल शेतकºयांकडून खरेदी करून तो माल बाजारभावापेक्षा कमी दराने विकणे असा उद्देश ठेवून ही संस्था कामाला लागली.

व्यवहारामध्ये दलाली नसल्याने शेतकºयांचा माल थेट ग्राहकाला विकून फायदा होत आहे.

च्मॉल, बाजार समिती, उच्चभ्रू शीतगृह दुकाने यामधून विक्री केलेला माल कमी दरात खरेदी करून अवाढव्य किमती आकारून तोच माल ग्राहकाला विकणे ही शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबेल. शासकीय मदतीने शेतकरी कंपन्या स्थापन करून आपल्यातच मालाची देवाणघेवाण करून शेतीमाल विकणे यामुळे स्थानिक शेतकºयांना फायदा होणार आहे. या कंपनीमुळे येथील शेतकºयांना आपल्या शेतमालासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि सेंद्रिय व उच्च प्रतीचा ताजा स्वच्छ भाजीपाला व फळे या कंपनीतून ग्राहकांना मिळणार आहेत.
कारली, पडवळ विदेशात
च्तालुक्यातील दुधी, कारली व पडवळ अशा प्रकारची भाजी कुवेत देशात कंपनीमार्फत निर्यात केली आहे. तिथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे व्यवसाय वाढविण्यावर अडचण येत आहे. परंतु व्यवसायवृद्धी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नात आहोत, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले.
 

Web Title: In Alibag, the tribal people have been involved in farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.