अलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आमदार बनवण्याची ताकद त्यांच्याकडेच असल्याने उमेदवारांचे लक्ष साहजिकच महिला मतदारांवर राहणार आहे.२०१४ सालच्या तुलनेमध्ये २०१९ मध्ये महिला मतदारांचे प्रमाण हे १० हजार ६७२ ने वाढले आहे, तर पुरुष मतदारांचे प्रमाण हे सातहजार ३५० ने अधिक असल्याचे दिसून येते. अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ९३ हजार ९६२ मतदार आहेत. यात अलिबाग तालुक्यातील दोन लाख सहा हजार ९०७, मुरु ड तालुक्यातील ६३ हजार ४६७ तर रोहा तालुक्यातील २३ हजार ५८८ मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात पुरु षांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. एक लाख ४५ हजार ९१९ पुरु ष तर एक लाख ४८ हजार ४३ महिला मतदार आहेत.२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एक लाख ३८ हजार ५६९ पुरुष मतदार होते, तर एक लाख ३७ हजार ३७१ महिला मतदार होत्या. यामध्ये २०१९ मध्ये महिला मतदारांच्या संख्येमध्ये १० हजार ६७२ तर पुरुष मतदारांच्या संख्येत सात हजार ३५० ने वाढ झाली आहे. त्यामुळे महिला मतदारांचे प्रमाण अधिक असल्याने त्याच अलिबागचा आमदार ठरवण्याची क्षमता ठेवून आहेत.विधानसभा निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघात एकूण ३७१ मतदान केंद्र असल्याची माहिती अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.अलिबागमध्ये चार मतदान केंद्राचे विभाजन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यात अलिबाग तालुक्यातील एक तर रोहा तालुक्यातील तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. सारसोली केंद्राचे विभाजन करून टिटवी हे नवीन केंद्र सुरू केले जाणार आहे. सूडकोली केंद्राचे विभाजन करून म्हसाडी केंद्र सुरू केले जाणार आहे.गायचोळ केंद्राचे विभाजन करून खांबेरे मतदान कें द्र सुरू करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील रुइशेत केंद्राचे विभाजन करून भोमोली हे केंद्र सुरू केले जाणार आहे. या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर चारही केंद्रांवर यंदा मतदान प्रक्रिया पार पडेल, असे पोवार यांनी सांगितले.
अलिबाग मतदारसंघात महिला मतदारांचे मत ठरणार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:39 AM