यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी

By राजेश भोस्तेकर | Published: July 30, 2024 12:34 PM2024-07-30T12:34:14+5:302024-07-30T12:34:29+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा

Alibagkar's tribute to Yashshree Shinde, people took to the streets to protest the massacre; Demand to hang the accused | यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी

यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी

अलिबाग : उरणमधील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी ३० जुलै रोजी अलिबागकर रस्त्यावर उतरले. केवळ समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागकर यात मोठ्या संख्येने एकत्र आले. यात महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सर्वांनी एकत्र येत तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला.  या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यशश्री शिंदे हीची निर्घृण हत्या केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे सर्व स्तरातून यशश्री च्या हत्येचा निषेध व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीस कर्नाटक येथून अटक केली आहे. अलिबागमध्ये सर्व अलिबागकर हत्येचा निषेधार्थ मुक मोर्चा काढण्यात येऊन निषेध व्यक्त केला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून जनजागृती केली. या मोर्चात राजकीय नेत्यांसह समस्त अलिबागकर उपस्थित होते.

Web Title: Alibagkar's tribute to Yashshree Shinde, people took to the streets to protest the massacre; Demand to hang the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.