शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लोकमत-रायगड वर्धापनदिनाकरिता अलिबाग नगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:14 AM

कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारा ते पीएनपी नाट्यगृह अशा अनोख्या सन्मानयात्रेचे आयोजन सकाळी ८ वाजता केले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : लोकमत रायगड वर्धापनदिनानिमित्तच्या ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक सन्मान यात्रा ते लोकमत-लोकगौरव पुरस्कार सोहोळ्याकरिता संपूर्ण अलिबाग नगरी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. यांचे सहकार्य लाभले आहे, ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या उपक्रमात सहभागी होणारे आर्मी, नेव्ही व एअर फोर्समधील यशस्वी वरिष्ठ अधिकारी भारत-पाक सर्जिकल स्ट्राइक यशस्वी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, एअरमार्शल (नि.) अरुण गरुड, भारतीय सेना मेडल प्राप्त ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, कर्नल (नि.) विनायक सुपेकर आणि मेज. जन. सतीश वासाडे हे सर्व मान्यवर बुधवारी संध्याकाळीच अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारा ते पीएनपी नाट्यगृह अशा अनोख्या सन्मानयात्रेचे आयोजन सकाळी ८ वाजता केले आहे. आर्मी, नेव्ही व एअरफोर्समधील हे सहा मान्यवरांकरिता विशेष स्फूर्तिरथाची निर्मिती करण्यात आली आहे. या रथापुढे रायगड पोलीस बॅण्डच्या तालावर एनसीसी कॅडेट परेड राहील. या सन्मानयात्रेचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आरसीएफचे कार्यकारी संचालक रवींद जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.दरम्यान, बुधवारी सकाळी आरसीएफ थळ युनिटचे कार्यकारी संचालक रवींद्र जावळे यांनी सन्मानयात्रा आणि दिवसभरातील कार्यक्रमाबाबत चर्चा केली. या वेळी आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम तडवळकर, उदय धुपकर आदी उपस्थित होते. दरम्यान, आरसीएफचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक उमेश धात्रक हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून, या बाबत आरसीएफ चेंबूर येथील जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर संयोजन करत आहेत. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हेही सहभागी झाले, सन्मानयात्रेच्या शुभारंभानंतर ते नगरपालिकेसमोर सन्मानयात्रेचे सर्व नगरसेवकांसह स्वागत करणार आहेत. रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनीदेखील सहकार्य केले. (संबंधित वृत्त ३,४)आम्हालाही मोठी उत्सुकता-एअरमार्शल (नि.) अरुण गरुड१००० विद्यार्थ्यांकरिता सकाळी ११ वाजता पीएनपी नाट्यगृहात होणाऱ्या प्रकटमुलाखतीचे मुलाखतकार रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत या सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी चर्चा केली. प्रकटमुलाखतीच्या या कार्यक्रमाबाबत आम्हालाही मोठी उत्सुकता असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने बोलताना एअरमार्शल (नि.) अरुण गरुड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.येत्या काळात जिल्ह्यातील अधिकारी तिन्ही सेना दलांत दिसतील - डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारीराज्यात प्रथमच होणाºया या अनन्यसाधारण युवाचैतन्याच्या ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या प्रकटमुलाखत कार्यक्रमात मुलाखत घेण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष तयारी केली असून, नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीच्या फिल्मची उपलब्धता त्यांनी करून दिली आहे. प्रकटमुलाखत कार्यक्रमांती जिल्ह्यातील मुलांमध्ये निश्चितच चेतना जागृती होऊन येत्या काळात जिल्ह्यातील अधिकारी तिन्ही सेनादलांत दिसतील, असा विश्वास डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.लोकमत-लोकगौरव पुरस्काररायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी बजावत असलेल्या गुणवंतांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना शाबासकीची थाप देऊन त्यांचा उत्साह वृद्धिंगत करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १२ गुणवंतांना गुरुवार, ३ जानेवारी लोकमत-रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त येथील पी.एन.पी. नाट्यगृहात संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहोळ्यात ‘लोकमत-लोकगौरव’पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी शुभा जोशी प्रस्तुत महाराष्ट्रातील निवडक गीतकारांच्या अजरामर गीतांवर आधारित ‘महाराष्ट्राची गीतगंगा’ ही बहारदार संगीत मेजवानी रसिकांना लाभणार आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत