शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 5:04 AM

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.

बोर्ली-मांडला : अलिबागहून मुरुडकडे सकाळी ६:१५ वाजता सुटणारी एसटी मंगळवारी ब्रेकडाउन झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसला. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.मुरुड एसटी डेपोची पार दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याच्या लायक आहेत आणि सर्व बस नवीन आणणे गरजेचे आहे. या जुन्या झालेल्या बसमुळे वारंवार या बस नादुरुस्त होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो, कारण वेळेत न पोहोचल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अशीच घटना २८ जानेवारी रोजी घडली. मंगळवारी सकाळी ६:१५ वाजता अलिबाग येथून सुटणारी मुरुड एसटी बस नेहमीप्रमाणे सुटली. या गाडीला नेहमी वर्दळ असते, याच गाडीत मुरुडसाठी येणाºया वर्तमानपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. कोर्लई येथून अनेक भाजीविक्रे त्या महिलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक ब्रेकडाउन झाली. यामुळे या बसने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला. या वेळी वाहक, चालक यांनी मुरुड आगाराशी संपर्क करून ब्रेकडाउन झालेल्या गाडीबद्दल सांगितले. त्या वेळी लवकरच नेहमीप्रमाणेगाडीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दुसºया गाडीची वाट पाहूनही बस येत नसल्याने अखेर सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच किलोमीटर पायपीट करीत कसेबसे नांदगाव गाठले. तेथून खासगी वाहनाने मुरुडला जाऊन शाळा, महाविद्यालय, आयटीआयला पोहोचले. उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले. याच गाडीत असणारे वृत्तपत्र उशिरा पोहोचल्याने विक्रेत्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.हीच बस बंद पडत नाही, तर या आगारातील अनेक फेºया मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अशा अनेक बसेस वारंवार बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी प्रवासी संघटनांनी मिळून आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात जाब विचारला असता, एका महिन्यात आगार सुस्थितीत करतो, असे वचन दिले होते; परंतु दोन महिने उलटले तरी, ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती आजही आहे.काही दिवसांपूर्वी मुरुड आगाराला राज्यात सर्वाधिक इंधन बचत म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले; पण या आगाराच्या गाड्या सतत बंद पडल्याने इंधनाची सर्वाधिक बचत झाली असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Raigadरायगड