अलिबागमध्ये एक कोटीची विजेची बिले थकीत, वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:35 AM2017-08-24T03:35:36+5:302017-08-24T03:35:38+5:30

वीज वितरणच्या अलिबाग उपविभागातील १२ शाखांमध्ये वीज बिल थकबाकीची रक्कम तब्बल एक कोटी २७ लाख ९० हजार एवढी आहे.

 In Alibaug, one crore electricity bills are exhausted, question mark on the functioning of power distribution | अलिबागमध्ये एक कोटीची विजेची बिले थकीत, वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अलिबागमध्ये एक कोटीची विजेची बिले थकीत, वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Next

- आविष्कार देसाई ।

अलिबाग : वीज वितरणच्या अलिबाग उपविभागातील १२ शाखांमध्ये वीज बिल थकबाकीची रक्कम तब्बल एक कोटी २७ लाख ९० हजार एवढी आहे. सुमारे अडीच लाख ग्राहकांच्या तुलनेत थकबाकी ठेवणा-यांची संख्या अडीच हजार एवढी आहे. यामध्ये ५ हजारांपेक्षा अधिक वीज बिल थकबाकी ठेवणा-यांची संख्या ८५९ एवढी आहे. या महिन्यात वीज देयके उशिरा आणि जास्त रकमेची आल्याच्या बºयाचशा तक्र ारी ग्राहकांनी केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने आंदोलन छेडून वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
वीज वितरणच्या अलिबाग उपविभागांमध्ये १२ शाखा आहेत. या शाखांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुमारे अडीच लाखांहून अधिक आहे. नियमितपणे वीज बिल भरणाºयांची संख्या समाधानकारक असली तरी, वीज देयके थकविणाºयांची संख्यादेखील लक्ष वेधणारी आहे. काही रु पयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची वीज देयके थकविणारे ग्राहक अलिबाग तालुक्यात आहेत. यापैकी ५ हजार रुपयांहून अधिक वीज देयके थकविणाºया थकबाकीदारांविरोधात वीज वितरणने मोहीम आखली आहे. वीज बिले थकविण्याºया ग्राहकांची संख्या ४८८ एवढी आहे. त्यांच्याकडून वीज वितरणला ५७ लाख ३८ हजार रुपयांची वसुली करावी लागणार आहे. तर ३०९ व्यावसायिक ग्राहकांकडून ५७ लाख ८ हजार रुपये थकबाकी वसूल करण्याची मोहीम आखण्यात आलेली आहे. एकूणच ८५९ ग्राहकांकडून १ कोटी २७ लाख ९० हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.
५ हजारांहून कमी वीज देयके असणाºया थकबाकीदार ग्राहकांकडून बिले वसुलीसाठीची मोहीम महावितरणाकडून गणेशोत्सवानंतर आखण्यात येणार आहे. यामुळे महावितरणचा नक्कीच फायदा होणार आहे.

- ५ हजार रुपयांहून अधिक वीज देयके थकबाकीदारांविरोधात वीज वितरणने मोहीम
- ५ हजारांहून कमी वीज देयके असणाºया थकबाकीदारांकडून गणेशोत्सवानंतर वसुलीसाठीची मोहीम

रिक्त पदांचे ग्रहण : अलिबाग उपविभागामध्ये लाइनमनची पदे रिक्त आहेत. यामध्ये अलिबाग-एकमध्ये १०, अलिबाग- दोनमध्ये ७, वरसोली ४, वरसोली ग्रामीण ३, नागाव-एकमध्ये ३, नागाव दोनमध्ये ७, चौल एकमध्ये ७, चौल दोनमध्ये ६, रेवदंडा एकमध्ये ८, रेवदंडा दोनमध्ये ७, रामराज ६ आणि फणसापूर शाखेत ७ पदे रिक्त आहेत. अशी एकूण ७५ लाइनमनची पदे रिक्त आहेत.

Web Title:  In Alibaug, one crore electricity bills are exhausted, question mark on the functioning of power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.