शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
2
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
3
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
4
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
5
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
6
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
7
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
8
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
9
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
10
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
11
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
12
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
14
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
15
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
16
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
17
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
19
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
20
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

अलिबागमध्ये एक कोटीची विजेची बिले थकीत, वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:35 AM

वीज वितरणच्या अलिबाग उपविभागातील १२ शाखांमध्ये वीज बिल थकबाकीची रक्कम तब्बल एक कोटी २७ लाख ९० हजार एवढी आहे.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : वीज वितरणच्या अलिबाग उपविभागातील १२ शाखांमध्ये वीज बिल थकबाकीची रक्कम तब्बल एक कोटी २७ लाख ९० हजार एवढी आहे. सुमारे अडीच लाख ग्राहकांच्या तुलनेत थकबाकी ठेवणा-यांची संख्या अडीच हजार एवढी आहे. यामध्ये ५ हजारांपेक्षा अधिक वीज बिल थकबाकी ठेवणा-यांची संख्या ८५९ एवढी आहे. या महिन्यात वीज देयके उशिरा आणि जास्त रकमेची आल्याच्या बºयाचशा तक्र ारी ग्राहकांनी केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने आंदोलन छेडून वीज वितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.वीज वितरणच्या अलिबाग उपविभागांमध्ये १२ शाखा आहेत. या शाखांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुमारे अडीच लाखांहून अधिक आहे. नियमितपणे वीज बिल भरणाºयांची संख्या समाधानकारक असली तरी, वीज देयके थकविणाºयांची संख्यादेखील लक्ष वेधणारी आहे. काही रु पयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची वीज देयके थकविणारे ग्राहक अलिबाग तालुक्यात आहेत. यापैकी ५ हजार रुपयांहून अधिक वीज देयके थकविणाºया थकबाकीदारांविरोधात वीज वितरणने मोहीम आखली आहे. वीज बिले थकविण्याºया ग्राहकांची संख्या ४८८ एवढी आहे. त्यांच्याकडून वीज वितरणला ५७ लाख ३८ हजार रुपयांची वसुली करावी लागणार आहे. तर ३०९ व्यावसायिक ग्राहकांकडून ५७ लाख ८ हजार रुपये थकबाकी वसूल करण्याची मोहीम आखण्यात आलेली आहे. एकूणच ८५९ ग्राहकांकडून १ कोटी २७ लाख ९० हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.५ हजारांहून कमी वीज देयके असणाºया थकबाकीदार ग्राहकांकडून बिले वसुलीसाठीची मोहीम महावितरणाकडून गणेशोत्सवानंतर आखण्यात येणार आहे. यामुळे महावितरणचा नक्कीच फायदा होणार आहे.- ५ हजार रुपयांहून अधिक वीज देयके थकबाकीदारांविरोधात वीज वितरणने मोहीम- ५ हजारांहून कमी वीज देयके असणाºया थकबाकीदारांकडून गणेशोत्सवानंतर वसुलीसाठीची मोहीमरिक्त पदांचे ग्रहण : अलिबाग उपविभागामध्ये लाइनमनची पदे रिक्त आहेत. यामध्ये अलिबाग-एकमध्ये १०, अलिबाग- दोनमध्ये ७, वरसोली ४, वरसोली ग्रामीण ३, नागाव-एकमध्ये ३, नागाव दोनमध्ये ७, चौल एकमध्ये ७, चौल दोनमध्ये ६, रेवदंडा एकमध्ये ८, रेवदंडा दोनमध्ये ७, रामराज ६ आणि फणसापूर शाखेत ७ पदे रिक्त आहेत. अशी एकूण ७५ लाइनमनची पदे रिक्त आहेत.