ठळक मुद्देअलिबाग पोलिसांनी त्यांनी रात्री 8.15 वाजता अटक केली आहे.
कोरलेई जमीन घोटाळाची चौकशी करायला ठाकरे सरकार तयार नाही, म्हणून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठिय्या, धरणा आंदोलन जिलाधिकारी कार्यालय अलिबाग येथे रात्रभर सुरू ठेवायचा निर्धार केला. मात्र, अलिबागपोलिसांनी त्यांनी रात्री 8.15 वाजता अटक केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरलई येथे जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. भाजपतर्फे ठाकरे यांच्या विरोधात आज (बुधवारी) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप नेते किरीट सोमय्या सहभागी झाले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत किरीट यांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवर ट्वीटद्वारे दिली आहे.