अलिबाग पर्यटन महोत्सवास गर्दीचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:52 AM2017-12-27T02:52:55+5:302017-12-27T02:52:57+5:30

अलिबाग : एकाहून एक सरस असे हास्य अभिनेते, नृंत्यांगना, गायक यांच्या सुरेल मिलाफ असलेली अलिबाग पर्यटन महोत्सवात तिसºया दिवशीही रसिकांनी गर्दी केली होती.

Alibaug tourism festival crowd records | अलिबाग पर्यटन महोत्सवास गर्दीचा विक्रम

अलिबाग पर्यटन महोत्सवास गर्दीचा विक्रम

Next

अलिबाग : एकाहून एक सरस असे हास्य अभिनेते, नृंत्यांगना, गायक यांच्या सुरेल मिलाफ असलेली अलिबाग पर्यटन महोत्सवात तिसºया दिवशीही रसिकांनी गर्दी केली होती.
येथील निषाद सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विक्र ांत वार्डे यांनी दिवस-रात्र एक करून केलेल्या त्या तालिमी... बसवलेली सेलिब्रिटी नाइट, आत्मविश्वासात जीव ओतून कलाकारांनी उत्साहात सादर केलेले कार्यक्र म, टाळ्यांचा कडकडाट... प्रेक्षकांची थिरकाणारी पावले आणि कलाकारांना मिळणारा वन्स मोअर, इतकेच नाही तर हास्यविनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे, असे वातावरण अलिबागकरांसह पर्यटकांनीदेखील अनुभवले सोमवारी अलिबाग पर्यटन महोत्सवातील निषाद सेलिब्रिटी नाइटमध्ये.
अलिबाग पर्यटन महोत्सवात निषाद सेलिब्रिटी नाइटमध्ये कॉमेडीची एक्स्प्रेस फेम अभिनेत्री हेमांगी कवी, प्रभाकर मोरे, अभिनेता प्रणव रावराणे, गायक राहुल सक्सेना, विक्र ांत वार्डे, मिथिला माळी, तसेच नृत्यांगना सारा श्रवण, योगेश काळबेरे, स्वाती हरवंदे, संतोष पाटील, भूमी काळबेरे यांनी सहभाग घेतला होता. एकाच मंचावर उपस्थित या दिग्गज कलाकारांनी प्रत्येकास खिळवून ठेवले होते. राहुल सक्सेना याने गायलेल्या ‘छैय्या छैय्या’ तसेच ‘दमा दम मस्त कलंदी’ व ‘लल्लाटी भंडार’ या गाण्यांवर तरुणांसह वृद्धांनीही ठेका धरला, तर ‘तेरी दिवानी’ या गाण्याने सर्वत्र शांतता पसरली होती.
विक्रांत वार्डे याच्या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले. तर हेमांगी कवी, मिथिला माळी, प्रणय रावराणे यांच्या सादरीकरणास प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते. कॉमेडी एक्स्प्रेस फेम प्रभाकर मोरे यांनी विविध विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. नृत्यांगना सारा श्रवण हिने सादर केलेल्या कॉकटेलवर महिलावर्गानेही ठेका धरला. कला, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अलिबाग नगरपरिषद आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या अलिबाग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे.
>ंअलिबागमध्ये निषाद सेलिब्रिटी नाइटमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी, प्रभाकर मोरे, अभिनेता प्रणव रावराणे, गायक राहुल सक्सेना, विक्रांत वार्डे, मिथिला माळी, तसेच नृत्यांगना सारा श्रवण, योगेश काळबेरे, स्वाती हरवंदे, संतोष पाटील, भूमी काळबेरे यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Alibaug tourism festival crowd records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.