लष्करी अधिकाऱ्यांना अलिबागकरांची मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:45 AM2019-01-08T02:45:13+5:302019-01-08T02:45:59+5:30
रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित ‘लष्करी ध्यासाचा सिक्स पॅक’ या कार्यक्रमात सहभागी भारत-पाक सर्जिकल स्ट्राईक यशस्वी लेफ्टनंट जनरल(नि.) राजेंद्र निंभोरकर
लोकमत-रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित ‘लष्करी ध्यासाचा सिक्स पॅक’ या कार्यक्रमात सहभागी भारत-पाक सर्जिकल स्ट्राईक यशस्वी लेफ्टनंट जनरल(नि.) राजेंद्र निंभोरकर, एअरमार्शल (नि.)अरुण गरुड, भारतीय सेना मेडल प्राप्त ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, कर्नल (नि.)विनायक सुपेकर, मेज.जन.सतीश वासाडे, कर्नल रणजीतसिंह नलावडे आणि रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी या मान्यवरांच्या सन्मानार्थ अलिबाग शहरात आयोजित ‘सन्मानयात्रा’ शहरवासीयांच्या अनोख्या एकात्मतेचे दर्शन घडवणारी ठरली आणि यावेळी सर्व मान्यवर भारावून गेले होते. रायगड पोलीस दलाच्या बॅन्डच्या देशभक्तीपर गीतांच्या विविध धूनवर एनसीसी कॅडेट्सच्या लयबद्ध परेडसह सन्मान यात्रेत अलिबाग शहरातील विविध धर्मीय बांधव, संस्था आणि समूह सहभागी झाल्याने अलिबागकरांनी संस्मरणीय करून वैविध्याचे दर्शन घडवले. सारे अलिबाग शहर अगदी सुखावून गेले होते.