महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे

By admin | Published: January 23, 2017 05:38 AM2017-01-23T05:38:10+5:302017-01-23T05:38:10+5:30

महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे. जलकुट्टीसाठी सगळे तमिळ एकत्र येतात मात्र गणेशोत्सव, दहीहंडी, बैलांच्या शर्यतींना

All the birds should come together for Maharashtra | महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे

महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे

Next

रोहा : महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे. जलकुट्टीसाठी सगळे तमिळ एकत्र येतात मात्र गणेशोत्सव, दहीहंडी, बैलांच्या शर्यतींना मात्र विरोध होतो. आम्ही विरोध केला की तो न्यायालयाचा अपमान होतो. यासाठी महाराष्ट्रात ही प्रत्येकाने प्रादेशिक जात्यंधता अंगिकारायला हवी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन यांचे काम निश्चितच अभिमानास्पद आहे, त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी रोहा येथे
केली.
रोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा डॉ चिंतामणराव देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार खासदार संजय राऊत यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी खासदार संजय राऊत बोलत होते. यावेळी राजाभाऊ देसाई स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार जयंत धुळप यांना, जनार्दन शेडगे स्मृती छायाचित्रकार पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार अतुल मळेकर यांना देण्यात आला. या कार्यक्र मात राज्य बालनाट्य स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळवलेल्या स्पंदन नाट्य संस्था, क्रि डापटू ओमकार हजारे, सागर झावरे व जलतरणपटू आर्य देसाई यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयंत धुळप, योगेश देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. पराग फुकणे यांनी प्रास्ताविक, आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन केले. पत्रकार संघाच्या सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहर सभागृहात झालेल्या कार्यक्र माला रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: All the birds should come together for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.