शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे

By admin | Published: January 23, 2017 5:38 AM

महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे. जलकुट्टीसाठी सगळे तमिळ एकत्र येतात मात्र गणेशोत्सव, दहीहंडी, बैलांच्या शर्यतींना

रोहा : महाराष्ट्रासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवे. जलकुट्टीसाठी सगळे तमिळ एकत्र येतात मात्र गणेशोत्सव, दहीहंडी, बैलांच्या शर्यतींना मात्र विरोध होतो. आम्ही विरोध केला की तो न्यायालयाचा अपमान होतो. यासाठी महाराष्ट्रात ही प्रत्येकाने प्रादेशिक जात्यंधता अंगिकारायला हवी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन यांचे काम निश्चितच अभिमानास्पद आहे, त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी रोहा येथे केली. रोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा डॉ चिंतामणराव देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार खासदार संजय राऊत यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी खासदार संजय राऊत बोलत होते. यावेळी राजाभाऊ देसाई स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार जयंत धुळप यांना, जनार्दन शेडगे स्मृती छायाचित्रकार पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार अतुल मळेकर यांना देण्यात आला. या कार्यक्र मात राज्य बालनाट्य स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळवलेल्या स्पंदन नाट्य संस्था, क्रि डापटू ओमकार हजारे, सागर झावरे व जलतरणपटू आर्य देसाई यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जयंत धुळप, योगेश देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. पराग फुकणे यांनी प्रास्ताविक, आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन केले. पत्रकार संघाच्या सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहर सभागृहात झालेल्या कार्यक्र माला रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)