उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींतील सर्वच ग्रामसेवक, संगणक कर्मचारी संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:36 PM2023-12-18T16:36:37+5:302023-12-18T16:36:59+5:30
ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर असे तीन दिवस बंद आंदोलन पुकारण्यात आले.
मधुकर ठाकूर
उरण : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपात उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीतील सर्वच ग्रामसेवक आणि संगणक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.या आंदोलनाला अनेक सरपंचांनी पाठिंबा दिला आहे.
ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर असे तीन दिवस बंद आंदोलन पुकारण्यात आले.या आंदोलनात उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीतील सर्वच २७ ग्रामसेवक आणि ३० संगणक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.त्यामुळे काही ग्रामपंचायतींचे कामकाज सुरू तर काही ठिकाणी ग्रामपंचायतींचे कामकाज बंद असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.या संपामुळे मात्र नागरिकांची कामे खोळंबली आहेत.