रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
By राजेश भोस्तेकर | Published: October 16, 2024 10:42 AM2024-10-16T10:42:49+5:302024-10-16T10:46:13+5:30
राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत.
अलिबाग : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रायगडच्या सातही विधानसभा मतदारसंघात युतीविरुद्ध आघाडी अशी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना तीन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि एक अपक्ष आमदार निवडून आले होते. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत.
अलिबाग मतदारसंघातील महेंद्र दळवी, महाडमधील भरत गोगावले आणि कर्जतचे महेंद्र थोरवे हे तीन आमदार शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत, तर अपक्ष म्हणून विजयी झालेले उरणचे आमदार महेश बालदी हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाचे सात ही आमदार हे सत्तेत आहेत. जिल्ह्यात मनसेचा प्रभाव अधिक नसला तरी अलिबाग, पेण आणि कर्जत याठिकाणी उमेदवार उभे राहणार आहेत.
ठाकरे गट, काँग्रेस, शेकाप, शरद पवार गट महाविकास आघाडीत असून, ते जिल्ह्यात युतीला टक्कर देणार आहेत.
जिल्ह्यातील २०१९ मधील चित्र
मतदारसंघ आमदार पक्ष
उरण महेश बालदी अपक्ष
पनवेल प्रशांत ठाकूर भाजप
कर्जत महेंद्र थोरवे शिवसेना
पेण रविशेठ पाटील भाजप
अलिबाग महेंद्र दळवी शिवसेना
श्रीवर्धन अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस
महाड भरत गोवावले शिवसेना
सध्याचे चित्र
मतदारसंघ आमदार पक्ष
उरण महेश बालदी भाजप
पनवेल प्रशांत ठाकूर भाजप
कर्जत महेंद्र थोरवे शिंदे गट
पेण रविशेठ पाटील भाजप
अलिबाग महेंद्र दळवी शिंदे गट
श्रीवर्धन अदिती तटकरे अजित पवार गट
महाड भरत गोवावले शिंदे गट