सेना-भाजपा-आरपीआय महायुती, पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:36 AM2019-01-12T02:36:02+5:302019-01-12T02:36:30+5:30

कर्जत नगरपरिषद निवडणूक : पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

alliance shivsena-BJP-RPI Mahayuti | सेना-भाजपा-आरपीआय महायुती, पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

सेना-भाजपा-आरपीआय महायुती, पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

Next

कर्जत : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी रोजी आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा-आरपीआय यांनी महायुती केल्याची घोषणा १० जानेवारी रोजी सायंकाळी पत्रकार परिषदमध्ये केली. गुरुवार, १० जानेवारीला छाननी होती. छाननी पार पडल्यानंतर बाजारपेठेतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात ७ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. शिवसेना शहरप्रमुख भालचंद्र जोशी यांनी, २०१४ रोजी झालेल्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र होतो. तीच युती आम्ही कायम करत आहोत.

कर्जत नगरपरिषदमध्ये परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने जनतेचा रेटा आहे, त्यामुळे आमची युती कायम आहे जागा वाटपाबद्दल तिन्ही पक्षांची चर्चा चालू होती आणि आमची चर्चा कोणाला समजू द्यायची नव्हती. आज छाननी झाल्यामुळे आम्ही ही युती जाहीर के ल्याचे सांगितले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांनी आम्ही तीनही पक्ष एकत्र आलो आहोत. नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश येईल. आम्ही एक आदर्श नगरपरिषद बनवू, असे सांगून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नगरपरिषद हद्दीमध्ये उणिवा आहेत त्या पूर्ण करणार, आम्ही जातीवर राजकारण करत नाही. जे जातपात करतात ते बाद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी मी आरपीआयमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो, तेव्हा नवीन असताना मला पायघड्या घातल्या गेल्या. मात्र, नंतर त्या काढल्या जातात याच अनुभव मला आला आहे. येत्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व नगसेवक निवडून आणून नगरपरिषदेची सत्ता मिळणार असे सांगितले. या वेळी सेनेचे शहरप्रमुख भालचंद्र जोशी, युवासेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, सचिव रमेश मुंढे, तालुका उपाध्यक्ष रमाकांत जाधव, शहराध्यक्ष अशोक ओसवाल, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल डाळींबकर आदी उपस्थित होते.

जागा वाटप जाहीर

निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-आरपीआय यांची महायुती झाली आहे, यामध्ये नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेने घेतली आहे, तर नगरसेवकपदासाठी शिवसेनेला दहा जागा, भाजपाला सहा जागा व आरपीआयला दोन जागा असे वाटप करण्यात आले आहे. मात्र, आरपीआयचे दोन्ही उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत.

Web Title: alliance shivsena-BJP-RPI Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.