ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २ - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा क्रांती सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिसरी संविधान हक्क परिषद नुकतीच पार पडली. संविधान दिनाचे औचित्य साधून यावेळी उपस्थितांना १२५ संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक अर्जून डांगळे यांची प्रामूख्याने उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत देश एकसंघ असून विविध जातीधर्माची लोक केवळ लोकशाहीमुळेच गुण्यागोविंदाने राहत असल्याचे ठाम मत ज्येष्ठ साहित्यिक अर्जून डांगळे यांनी यावेळी व्यक्त केले. भारताचे संविधान व उद्देशिकेचे उद्घाटन फादर मायकलजी यांच्या हस्ते करण्यात आले. युवा क्रांती सभेचे अध्यक्ष विशाल हिवाळे यांनी या कार्यक्रमात संविधानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला वॉल्टर डिसोजा, निलेश करी, मलविन घोन्साविस, ममता मोरे, विजय माने, सुरेश कांबळे, इंदू, सुजित पगारे, सुधाकर उघडे, जगन्नाथ आढाव, विजय माने, अशोक साळवे, माहिनी अनावरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
संविधान हक्क परिषदेत संविधान उद्देशिकेचे वाटप
By admin | Published: February 02, 2015 11:42 PM