भातशेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आंबा, भाजीपाला लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:14 AM2018-11-21T00:14:44+5:302018-11-21T00:14:55+5:30
रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा.
कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले.
रायगड जिल्हा विकास मंडळ व अलिबाग तालुका आंबा बागायतदारांची सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने हाशिवरे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकºयांनी प्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही शेळके यांनी सांगितले. यावेळी कृषी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
मेळाच्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल होते. कोकणात आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहोराचे संवर्धन महत्त्वाचे आहे. कारण याचवेळी अनेक रोगांचे आक्रमण होते. ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व औषधांच्या फवारण्यासाठी कृषी अधिकाºयांचे व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदशर््न तसेच मान्यवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाºया निमखाºया पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मोकल यांनी सांगितले.
एपीएमसीमध्ये शेतकºयांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात विक्री केंद्र उभारणे, आंध्र व कर्नाटकच्या आंब्याचे आक्रमण रोखण्यासाठी कोकण हापूसचे ब्रँडिंग करणे, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. कोकण हापूसला यूएईबरोबरच आशिया खंडात देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेता सेंद्रिय आंबा व भाजीपाला उत्पादनावर भर द्यावा, असेही आवाहन केले.
आंब्यावरील कीड रोगाचे नियंत्रण, औषध आंबा मोहोराचे संरक्षण, शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. अविनाश शिंदे यांनी तर सर्व प्रकारच्या अन्य व्यवसायावर तारापूर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रकाश शिंगारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.