अनधिकृत बांधकामाविरोधात आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:37 PM2018-10-23T23:37:47+5:302018-10-23T23:37:51+5:30
नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
कर्जत : तालुक्यातील नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याविषयी गेले दीड ते दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विजय हजारे यांनी शासन दरबारी लेखी तर कधी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, शासन अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीऐवजी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.
अनेक कार्यालयाच्या अधिकाºयांनी लेखी पत्र देवून कारवाई करण्याचा शब्द दिला, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. अधिकाºयांच्या खोट्या भूलथापांना कंटाळून विजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी आमरण उपोषण सुरू केले आहे.
हजारे यांच्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (अलिबाग) अधिकारी प्रत्यक्षात येत नाही, आणि बांधकाम तोडण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात रस्त्यालगत संबंधित अधिकाºयांनी अधिकाराचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. जाणीवपूर्वक इमारतीची बांधकामे न थांबविणे किंवा काढून टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. विभागातील अधिकाºयांनी ७६ बांधकामे अनधिकृत ठरवली असूनही सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी सदनिकांची खरेदी-विक्र ी ही थांबविण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाºयांनी संदर्भपत्राचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा नोंदवून अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी तसेच अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर तंटामुक्त अध्यक्ष विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.
२०१७ पासून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात नेरळ-कळंब रस्ता, नेरळ-कशेळे व नेरळ व बोपेले रस्ता व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यालगत होणाºया नियमबाह्य अनधिकृत बांधकामे थांबविण्याबाबत शासन दरबारी सतत अर्ज करीत आहे. रस्त्यालगत संबंधित अधिकारी ग्रामसेवक, तलाठी मंडळाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय प्रांत अधिकारी, उपअभियंता बांधकाम उपविभाग, दुय्यम निबंधक कर्जत, नेरळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हाधिकारी या सक्षम अधिकाºयांनी सदर रस्त्यावरून विकासकामांना भेटी देत, फिरती करून प्रवास भत्ताही घेतला आहे.