शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

माणगाव, पोलादपूरमध्ये रुग्णवाहिका बंद, डॉक्टर नसल्याने अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:46 AM

संपूर्ण राज्यात १०८ नंबरच्या रुग्णवाहिका शासनाने ग्रामीण रुग्णालयात दिल्याने सर्वसामान्य रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी स्थलांतर करताना सोपे झाले.

- सिकंदर अनवारे दासगाव : संपूर्ण राज्यात १०८ नंबरच्या रुग्णवाहिका शासनाने ग्रामीण रुग्णालयात दिल्याने सर्वसामान्य रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी स्थलांतर करताना सोपे झाले. आधुनिक पद्धतीच्या वातानुकूलित रुग्णवाहिकांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी डॉक्टरांअभावी या रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. माणगाव आणि पोलादपूरमधील रुग्णालयात १०८ नंबरच्या रुग्णवाहिकाही बंद असल्याने रुग्णांचे हाल झाले आहेत.१०८ या आॅन कॉल तत्त्वावरील रुग्णवाहिका शासनाने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सुरू केल्या. या रुग्णवाहिकांमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा झाला. अपघातप्रसंगी किंवा महिलांकरिता या रुग्णवाहिका वरदान ठरल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका या वातानुकूलित असून, यामध्ये आॅक्सिजन आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय एक डॉक्टरही असल्याने रुग्ण स्थलांतर करताना रुग्णांची स्थिती वेळोवेळी जाणून घेता येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका डॉक्टरांअभावी बंद आहेत. यामध्ये माणगाव आणि पोलादपूरमधील रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.माणगाव आणि पोलादपूरमधील ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार घेणे परवडते, यामुळे माणगाव आणि पोलादपूरमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. मात्र, अन्य ठिकाणी उपचारासाठी रुग्णांना स्थलांतर करायचे असेल तर १०८ नंबरवरून रुग्णवाहिका मागवणे सहज शक्य होते. माणगाव आणि पोलादपूर येथील दोन्ही रुग्णवाहिका डॉक्टरांअभावी गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हीच अवस्था महाड ट्रामामध्येही झाली असून, महाड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका गेली अनेक दिवस टायरअभावी उभी आहे. महाड ट्रामा युनिटला सर्वाधिक महत्त्वाची सुविधा असलेली रुग्णवाहिकाच उपलब्ध नाही. या ठिकाणी महाड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली जात आहे. मात्र, ही रुग्णवाहिकाही सध्या बंद आहे.>खासगी रुग्णवाहिकेचा भुर्दंड रुग्णांनामहाड तालुक्यातील सुमारे ३०० च्या आसपास रुग्ण प्रतिदिन ट्रामा केअरमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. यातील काहींना तातडीच्या उपचाराकरिता किंवा महामार्ग अपघात प्रसंगी अपघातग्रस्तांना मुंबई किंवा अन्य रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यासाठी १०८ चा वापर केला जातो. शिवाय, पोलादपूर किंवा माणगावमध्येही महाडमधील १०८ रुग्णवाहिकाच जात असल्याने या ठिकाणी रुग्णवाहिकेची नितांत गरज भासत असते. तिन्ही रुग्णालयाला सध्या एकच रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने अपघातामधील रुग्णांना १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णवाहिकेने पाठवले जाते, यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा भुर्दंड रुग्णांना किंवा अपघातग्रस्तांना सहन करावा लागत आहे.>रुग्णवाहिकेचा टायर खराब झाला असून, नवीन टायर बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर तरतूद ठेवण्यात आली नसून याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे टायर बदलीसाठी पत्रव्यवहार के ला आहे. या बाबत अद्याप उत्तर न मिळाल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे. शिवाय, शासनाची १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी ही रुग्णवाहिका अपघातावेळी किंवा रुग्णांना आणण्यासाठी किंवा मुंबईसह अन्य ठिकाणी गेल्यानंतर महाड ट्रामाकडे रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही.- डॉ. दीपक अडकमोल, प्रभारी अधीक्षक