अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आंबा व भाजीपाला निर्यात युरोप आणि अमेरिकेत करण्याची संधी जिल्ह्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू के ली आहे. निर्यात करू इच्छिणाºया बागायतदार व शेतकºयांसाठी कृषी विभागामार्फत ‘मँगोनेट’ व ‘व्हेजनेट’ ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीवर जिल्ह्यातील इच्छुक निर्यातदार शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. गतवर्षी आंबा निर्यातीकरिता जिल्ह्यातील ८६५ आंबा बागायतदार ‘मँगोनेट’वर नोंदणीकृत झाले होते.जिल्ह्यात २०१७-१८ च्या हंगामाकरिता युरोपियन व इतर देशात आंबा व भाजीपाला निर्यात करू इच्छिणाºया शेतकºयांना बागांची मँगोनेट व व्हेजनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०१८ आहे तर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी नोंदणीची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१७ आहे.निर्यातक्षम भाजीपाला निर्यात नोंदणी करण्यासाठी व्हेजनेट या प्रणालीवर शेतकरी नोंदणी करु शकतात. नोंदणी भाजीपाला लागवडीनंतर पंधरा दिवसांनी परंतु काढणीच्या एक महिना आधी करणे बंधनकारक आहे. मँगोनेट तसेच व्हेजनेट अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ७/१२ आणि ८अ व शेताचा स्थळदर्शक नकाशा जोडणे आवश्यक आहे. आंबा व भाजीपाला निर्यात करण्यास इच्छुक असणाºया जास्तीत जास्त शेतकºयांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे.नोंदणी करणे आवश्यकमॅगोनेट तसेच व्हेजनेटअंतर्गत नोंदणी करण्यासाठी ७/१२ आणि ८अ व शेताचा स्थळदर्शक नकाशा जोडणे आवश्यक आहे.गतवर्षी आंबा निर्यातीकरिता जिल्ह्यातील ८६५ आंबा बागायतदार ‘मँगोनेट’वर नोंदणीकृत झाले होते.
अमेरिकेत आंबा निर्यातीची तयारी सुरू, नोंदणी करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:24 AM