पनवेलमध्ये रंगीत कलिंगडाच्या लागवडीचा प्रयोग
By वैभव गायकर | Published: January 2, 2024 02:49 PM2024-01-02T14:49:41+5:302024-01-02T14:49:50+5:30
शेतकऱ्यांनी याची लागवड रब्बी हंगामात केली व योग्य प्रमाणात नीगा राखली तर उत्कृष्ट असे उत्पादन मिळेल
पनवेल:शेतीमध्ये नवनवीन उत्पादने घेण्याचा प्रयत्न करणारे पनवेल मधील गुळसुंदे येथील प्रगतशील शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी रंगीत कलिंगड लागवडीचा प्रयोग राबवला आहे.आक्टोबर 2023 मध्ये साधारण 10. कलिंगडाच्या रोपाची लागवड केली होती.गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
नोन यु सीडस या कंपनीच्या कलिंगडाच्या प्रजातीच्या बीया ज्यामध्ये पीवळे आवरण असुन आतील गर लाल आहे. आरोही प्रजातीचे बियाणे हीरवट काळे असुन आतील गर पिवळ्या रंगाचा आहे.तसेच कुंदन ही मस्कमेलन ची व्हरायटीज ची लागवड देखील गाडगीळ यांनी केली आहे.वेगवेगळ्या प्रजातीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे..गाडगीळ यांनी आपल्या 10 गुंठे जागेत शेणखत देउन दोन फुट बाय पाच फुट अंतर ठेवुन वाफे बनवले व ड्रीपच्या माध्यमातुन पाणी व्यवस्थापन करुन अतिशय कमी खत व फवरण्या दिल्यानंतर तीन महिन्यांत कलिंगडाचे उत्पादन प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यातील हवामान व माती कलिंगडासाठी अतिशय पोषक असल्याने जास्तीजास्त शेतकऱ्यांनी हे उत्पादन घ्यावे असे अवाहन त्यानी केले आहे. चवीला अतिशय गोड, एक वेगळाच स्वाद व अकर्षक रंग यामुळेच या कलिंगडाना ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे मीनेश गाडगीळ यांनी सांगीतले.
शेतकऱ्यांनी याची लागवड रब्बी हंगामात केली व योग्य प्रमाणात नीगा राखली तर उत्कृष्ट असे उत्पादन मिळेल व जवळपास चा विकसीत होणारा भाग लक्षात घेता .चांगला ग्राहकवर्ग देखील या उत्पादनाला मिळेल असे गाडगीळ यांनी सांगितले.
पर्यायी म्हणून घेण्याचे आवाहन
तारांकीत हॉटेल मध्ये या कलिंगडाची विशेष मागणी आहे.पारंपारिक पीके भात नंतर पर्यायी पीक म्हणुन कलिंगडाची लागवड करता येईल.कमी वेळात अधिक फायदा देणारे हे पीक आहे.