नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:41 PM2024-02-08T16:41:39+5:302024-02-08T16:42:39+5:30

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वाहतूक खोळंबली; हजारो वाहनांच्या आठ किलोमीटरपर्यंत रांगा

An out of control NMMT bus rammed into three bikes with a tempo, one dead, two seriously injured | नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मधुकर ठाकूर, उरण: नियंत्रण सुटलेल्या एनएमएमटी बसने उरणच्या खोपटा रस्त्यावरील मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली.या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.गुरुवारी सकाळीच घडलेल्या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केले.यामुळे मात्र खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.

नवी मुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन वाशीहून कोप्रोलीकडे निघाली होती.सकाळी १० वाजता सुमारास खोपटा गावाजवळ रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने एका मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.या अपघातात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अमेयला कंपनीत सर्व्हेअर म्हणून काम करीत असलेले खोपटा येथील रहिवासी मोटार सायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे (३३) यांचा मृत्यू झाला.तर त्याचा अन्य सहकारी केशव ठाकूर (५४) आणि अन्य एक इसम गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातात रहिवाशांचाच मृत्यू आणि जखमी झालेले असल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या खोपटा ग्रामस्थांनी रस्त्यावर धावणारी वाहतुकच बंद करून रास्ता रोको केले.एनएमएमटी व्यवस्थापन मृत आणि जखमी झालेल्या इसमांच्या कुटुंबातील आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही.उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी रास्तारोकोमुळे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची माहिती देऊन ग्रामस्थांना देऊन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावाने त्यांना दाद दिली नाही.त्यामुळे खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान रस्त्यांवर आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.यामुळे मात्र वाहतूकदार, कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

ग्रामस्थांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासूनच सुमारे सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.या रास्तारोकोमुळे खोपटा पुल - मोठीजुई आणि खोपटा -धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला आहे.दरम्यान लोकप्रतिनिधी,एनएमएमटी व्यवस्थापनाचे अधिकारी, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मृत व जखमींना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी बैठकीत चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: An out of control NMMT bus rammed into three bikes with a tempo, one dead, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.