कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:53 AM2017-08-14T02:53:23+5:302017-08-14T02:53:27+5:30

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे.

The ancient Shiva temple in Karjat's Shalivahana period | कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

विजय मांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराजांनी सुरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले असल्याने बोलले जाते. मात्र तासभर डोंगर चढउतार करावा लागत असताना देखील असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.
शके १९३७ मध्ये सह्याद्रीच्या सुळक्यावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची रूपे तेथे पाहायला मिळतात. या शिवमंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत, त्या कुंडामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशा प्रकारे अगदी जवळजवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती २० वर्षांपासून परिसराला झाल्याचे बोलले जात आहे. स्वामी समर्थ यांचे बदलापूर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले. गडाची पाहणी करीत असताना त्यांना नेरळकडील बाजूस मातीमध्ये गाडलेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खडे यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवून खोदकाम सुरू केले.त्या वेळी तेथे शिवलिंग आणि पाण्याचे कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत.परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त दीड तासाची पायपीट करून दर्शनासाठी येतात.
येथे पोहचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असून देखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देवून दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाइप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर मंदिराजवळ पोहचतो. सध्या तेथील वातावरण प्रचंड आल्हाददायक असून सभोवताली प्रचंड हिरवाई नटली आहे.

Web Title: The ancient Shiva temple in Karjat's Shalivahana period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.