शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:53 AM

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे.

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराजांनी सुरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले असल्याने बोलले जाते. मात्र तासभर डोंगर चढउतार करावा लागत असताना देखील असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.शके १९३७ मध्ये सह्याद्रीच्या सुळक्यावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची रूपे तेथे पाहायला मिळतात. या शिवमंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत, त्या कुंडामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशा प्रकारे अगदी जवळजवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती २० वर्षांपासून परिसराला झाल्याचे बोलले जात आहे. स्वामी समर्थ यांचे बदलापूर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले. गडाची पाहणी करीत असताना त्यांना नेरळकडील बाजूस मातीमध्ये गाडलेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खडे यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवून खोदकाम सुरू केले.त्या वेळी तेथे शिवलिंग आणि पाण्याचे कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत.परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त दीड तासाची पायपीट करून दर्शनासाठी येतात.येथे पोहचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असून देखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देवून दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाइप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर मंदिराजवळ पोहचतो. सध्या तेथील वातावरण प्रचंड आल्हाददायक असून सभोवताली प्रचंड हिरवाई नटली आहे.