Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:10 PM2021-07-24T14:10:50+5:302021-07-24T14:11:32+5:30

Taliye Landslide: तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे.

... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience | Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

googlenewsNext

रायगड - मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदतकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे. डोंगराला भेग जाऊन दरड कोसळतेय हे दिसताच गावकरी घरे सोडून निघून जाण्यासाठी एकत्र आले असतानाच अचानक मातीचा ढिगारा खाली आला आणि यामध्ये सगळे गाडले, गेले अशी माहिती या आजोबांनी दिली. (... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience)

यासंदर्भातील वृत्त टीव्ही-९ मराठीने प्रसिद्ध केले आहे. दुर्घटनेत बालंबाल बचावलेल्या बबन सकपाळ नावाच्या आजोबांनी सांगितले की, संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास दुर्घटना घडली. वर दरड कोसळतेय म्हणून आरडाओरडा झाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो. मात्र आम्ही घरातून बाहेर पडत असतानाच वरून मातीचा ढिगारा आला आणि आजूबाजूची घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. आमच्या नव्या घराच्या मागे असलेलं आमचं जुनं घरही या दुर्घटनेत भुईसपाट झालं.

डोंगराला भेग जाऊन दरड कोसळणार असे वाटू लागल्याने गावातील लोक सावध झाले होते. सगळे एकत्र येऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. मात्र त्याचवेळी अचानक वरून दरडीची चिखल माती आली आणि सगळे गाडले गेले. सुदैवाने आम्ही लोकं जमले होते त्या दिशेला न जाता दुसऱ्या वाटेला गेलो त्यामुळे आम्ही बचावलो. पण तिथे जमलेले सगळे गाडले गेले. कुणीच जिवंत राहिला नाही, असे या आजोबांनी सांगितले.

आमच्या घरात आम्ही तीन माणसं राहतो. आम्ही तिघेही बचावलो. मात्र घरावर दगड माती येऊन पडली आहे. घरात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. घरातलं धान्य भिजून गेलं आहे. राहायला जागा नाही. आता मी कुटुंबाला घेऊन चार गुरांना घेऊन रानात राहतोय. खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे, अशी व्यथा या ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.  

Web Title: ... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.