- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यात अंगणवाडी सेविकांची १६ पदे रिक्त असून अंगणवाडीवर लागणाऱ्या मदतनिसांच्या देखील २३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे महाडमधील अंगणवाड्या धोक्यात आल्या आहेत. तालुक्यातील काही गावांत अंगणवाडी सेविकांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अटीतील उमेदवार मिळत नसल्याने काही अंगणवाड्या मंजूर असूनदेखील सुरू झालेल्या नाहीत.ग्रामीण भागातील तरुणांच्या स्थलांतरामुळे गावे ओस पडू लागली आहेत. याचा परिणाम गावातील शाळा आणि अंगणवाड्यांवर होत आहे. यामुळे महाडच्या अनेक अंगणवाड्यांवर बालकांची संख्या घटत चालली आहे. गावातील तरु ण वर्ग मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी शहरात गेले असून त्याच ठिकाणी स्थायिकदेखील झाले आहेत. शिवाय, शहरामध्ये प्ले हाउस, नर्सरीसारखे नवे प्रयोग आल्याने नागरिकांमध्ये याची क्रे झ वाढली आहे. यामुळे शासकीय अंगणवाड्यांवर विविध सुविधा उपलब्ध असताना देखील ओस पडत आहेत. येथे प्रवेश घेणाºयांची संख्या प्रत्येक वर्षाला घटत आहे.पोषण आहार, मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बालकांच्या मातांची आरोग्य तपासणी आदी सुविधा या ठिकाणी मिळतात, तरी देखील प्ले हाउसच्या हौसेमुळे या बालकांना अल्प वयातच कठीण शिक्षणाची पायरी पालक चढवत आहेत.तालुक्यातील जिते तेरडेवाडी, गारपाटले, गोंडाळे कुडवेवाडी येथे अंगणवाडी मंजूर आहेत. मात्र, २१ ते ३० वयोगटातील महिला किंवा मुली १० वी पास शिक्षण घेतलेल्या मिळत नाहीत. वर्षभरापूर्वी याबाबत जाहिरात प्रसिद्ध करूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याचे महिला बाल कल्याण विकास प्रकल्पाकडून माहिती देण्यात आली. त्यातच महिला बालकल्याण विभागाकडून २०१७ मध्ये अंगणवाडी सेविका पदांच्या भरतीबाबत स्थगिती आदेश देण्यात आला आहे, यामुळे ही पदे रिक्त राहिली आहेत.कमी पटसंख्या कारणीभूतमहाड तालुक्यात जवळपास २० अंगणवाड्या कमी पट संख्येत आहेत. किमान १० च्या आत असलेल्या या अंगणवाड्या आहेत. यामुळे भविष्यात या अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यता आहे.महाड तालुक्यात मिनी अंगणवाड्यांवर १६ सेविकांची पदे रिक्त आहेत, तर अंगणवाडी सेविकांची १० पदे, मदतनिसांच्या २३ जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागातील स्थलांतरामुळे शिक्षण घेतलेल्या मुली किंवा महिला मिळणे कठीण झाले आहे.अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यतारिक्त पदांची संख्या आणि ग्रामीण भागातील स्थलांतर यामुळे गावातील अंगणवाड्या ओस पडू लागल्या आहेत. भविष्यात अंगणवाडी बंद पडणे ग्रामीण भागाला धोकादायक आहे. ग्रामीण भागात दिल्या जाणाºया सुविधा, आरोग्य तपासणी, लसीकरण, जनगणना आदी शासकीय कामातदेखील अंगणवाडी सेविकांचे योगदान असते, यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू राहणे महत्त्वाचे आहे.महाड तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. याबाबत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, काही गावांत शैक्षणिक अट असलेल्या महिला उपलब्ध न झाल्याने अंगणवाडी सुरू करता आल्या नाहीत तर महिला बाल कल्याण विभागाकडून नवीन भरतीबाबत स्थगितीदेखील आहे.- राजेश्री बने, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महाड
महाड तालुक्यातील अंगणवाड्या धोक्यात !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:43 PM