शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

उरण येथील महाराष्ट्र बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 5:51 PM

अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.

मधुकर ठाकूर, उरण : उरण शहरातील सर्वात जुनी असलेली महाराष्ट्र बॅक आनंदनगर येथील अपुऱ्या जागेत स्थलांतर करण्यात आली आहे.यामुळे अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र बॅकेची शाखा उरण शहरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यरत होती.काही महिन्यांपूर्वी ही बॅक आनंद नगर येथील एका इमारतीत हलविण्यात आली आहे.२० फुटी बाय १५ फुट चौरस फुट जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या अपुऱ्या जागेमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.एकाच काउंटरवरुन या बॅकेचे काम सुरू झाले आहे.

सुमारे सेवानिवृत्त ३००० कर्मचाऱ्यांची याच बॅकेत खाती आहेत.मात्र बॅकेत आबालवृद्धांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.एटीएमची व्यवस्था असली तरी अधुनमधून तीनतीन-चारचार दिवस मशिनमध्ये रोख रक्कम उपलब्ध नसते.ग्राहकांना भेडसावणाऱ्या गैरसोयी व विविध समस्यांमुळे अनेक ग्राहकांनी आपली खाती दुसऱ्या बॅकेत हलविली आहेत.त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी बॅकेने कर्मचारी संख्येत वाढ करावी, ग्राहकांना भेडसावणाऱ्या गैरसोयी, समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी ग्राहक ॲड.दत्तात्रेय नवाळे यांनी उरण शाखा व्यवस्थापक व वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

सेवानिवृत्त आबालवृद्ध ग्राहकांना पहिल्या मजल्यावर असलेल्या जुन्या बॅकेत चढ उतार करणे कठीण होतं होते.त्यामुळेच ग्राहकांच्या सोयीसाठी शाखा इतर ठिकाणच्या तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहे.स्थलांतरित करण्यात आलेली शाखा नियमानुसार जागेत आहे.कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असली तरी कर्मचारी वाढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होईल.एटीएममध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी मुख्यालयाने एजन्सीची नेमणूक केली आहे.पैसे संपल्यानंतर संदेश प्राप्त होताच एजन्सी मार्फत एटीएममध्ये रोख रक्कम भरली जाते. ग्राहकांच्या गैरसोयी दूर करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती उरण महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती मृणालिनी गजबे यांनी दिली.

टॅग्स :bankबँक