राग अनावर! हरिहरेश्वरमध्ये होम स्टेसाठी नकार दिल्याने पर्यटकांनी महिलेस कारखाली चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:39 AM2024-10-21T09:39:08+5:302024-10-21T09:39:38+5:30

ज्योती धामणस्कर (३४) असे यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव; तिघांना अटक, ९ फरार

Anger rage Tourists crush woman under car after refusing home stay in Harihareshwar | राग अनावर! हरिहरेश्वरमध्ये होम स्टेसाठी नकार दिल्याने पर्यटकांनी महिलेस कारखाली चिरडले

राग अनावर! हरिहरेश्वरमध्ये होम स्टेसाठी नकार दिल्याने पर्यटकांनी महिलेस कारखाली चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीवर्धन (जि. रायगड): पिंपरी-चिंचवड येथील पर्यटकांना होम स्टेसाठी नकार दिल्याने रागापोटी श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथील एका महिलेच्या अंगावर कार घालत तिला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ज्योती धामणस्कर (३४) असे यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर फरार आहेत. शनिवारी मध्यरात्री १:३०च्या सुमारास ही घटना घडली. रविवारी पर्यटनस्थळी या घटनेचीच चर्चा होती.

आधी मारहाण करून पळाले, मग अंगावर गाडी घातली

पिंपरी-चिंचवड येथील ११ पर्यटक कारने हरिहरेश्वर येथे आले होते. येथील अभिजित धामणस्कर यांच्या ममता होम स्टेवर त्यांनी राहण्यासाठी जागा मागितली. मात्र, त्यांनी मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून धामणस्कर यांनी त्यांना नकार दिला. याचा राग आला, म्हणून धामणस्कर यांना मारहाण करीत त्यांनी पळ काढला. मात्र, एक सहकारी स्थानिकांच्या हाती लागला. त्याने इतरांना बोलावून घेतले. त्यांनी पुन्हा स्थानिकांशी वाद घातला. 
पकडलेल्या सहकाऱ्याला सोडण्याची मागणी करत हॉटेल मालक व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, स्थानिकांनी त्याला सोडले नाही. याचा राग मनात धरून आरोपीने ज्योती यांच्या अंगावर स्कार्पिओ कार घातली. यात ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीवर्धन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इराप्पा धोत्रे (कासारवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) व विकी सिंग, आकाश गावडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Anger rage Tourists crush woman under car after refusing home stay in Harihareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.