निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वाहन चालविताना सतत मोबाइलवर बोलन वा व्हाॅट्सॲपवर चॅट करण्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून गाडीला आरसा नसल्यास व विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या, पण हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई करून २६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मोटरसायकलला दोन आरसे लावणे बंधनकारक आहे. मात्र आजची स्टाईल म्हणून आरसे न लावता मोटरसायकलस्वार गाडी हाकताना दिसत आहेत. त्यामुळे मागून ओव्हर टेक करणारा दिसून येत नाही. दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमातून लावले जातात; परंतु युवावर्ग गाडी माॅडीफाय करून दोन्ही आरसे काढीत आहेत.
आरसा नाही म्हणून २०० रुपयांचा दंड मोटरसायकलला माॅडीफाय करून तिचा स्पोर्ट्स बाईक म्हणून वापर करणारे गाडीचे दोन्ही आरसे काढून टाकतात. त्यामुळे मोटरसायकलस्वारांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते. अपघात थोपविण्यासाठी मोटरसायकलला आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.
वाहतुकीचे हे नियम बंधनकारक मोटार वाहन कायद्याअंतर्गत असणारे सर्व नियम बंधनकारक आहेत, तसेच गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट व इन्शुरन्स नसल्यामुळे ४ कोटी ६९ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड वर्षभरात वसूल करण्यात आला आहे.
गेले अनेक दिवस मोबाइलचा वापर करीत वाहन चालविणाऱ्या नागरिकांत वाढ झाली आहे. तसेच सध्या गाडीला आरसे न लावणाऱ्या वाहनचालकांना समज देऊन त्यांना आरसे लावण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच गाडीला आरसा नसल्यामुळे मोटरसायकलस्वाराकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.- रवींद्र शिंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक