रोहा : आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या अनिलकुमार शर्मा तरुणाचा अखेर बुधवारी रात्री मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. अनिलकुमार शर्माची आत्महत्या की हत्या? याबाबत गूढ अधिकच वाढले. अनिलकुमार शर्मा याने आत्महत्या केली नाही. त्याचा घातपात असल्याचा आरोप शर्मा कुटुंबीयांनी केला.
डीएमसी कंपनीत कायम असलेला कामगार अनिलकुमार शर्मा आत्महत्या करणे शक्य नाही. वेगळ्या कारणाने त्याची हत्या झाली, असा दाट संशय आता व्यक्त होत आहे. तर शर्मा याच्या हत्येबाबत वेगवेगळे तर्क ग्रामस्थ व विभागातील तरुणांनी व्यक्त केल्याने अनिलकुमार शर्माच्या मृत्यूबाबत अनेक शंका आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, अनिलकुमार शर्मा याची हत्या झाली का, त्याच्या शरीरावर कोणत्या जखमा आहेत, या दृष्टीने धाटाव, रोहा पोलीस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
रोठ बुद्रुक गावात भाडोत्री राहणारा अनिलकुमार शर्मा वय अंदाजे २९ हा तरुण डीएमसी कंपनीत कायमस्वरूपी कामगार होता. शर्मा हा विवाहित होता. तरीही त्याचा स्वभाव द्विधास्थितीत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्याच घटनेतून त्याची हत्या घडली असावी असेही काहींनी सांगितले. याउलट अनिलकुमार शर्मा हा आठवड्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याबद्दलची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी पोलीस ठाण्यात केली. तद्नंतर त्याचा शोध सुरू असतानाच बुधवारी रात्री शर्मा याचा मृतदेह अंशुल कंपनी जवळच्या नाल्यात सापडला. त्यामुळे अनिलकुमार शर्मा याची आत्महत्या वा त्याची हत्या कधी झाली? याचा तपाससुद्धा पोलीस करीत आहेत. मात्र, शर्मा याचे वय पाहता आत्महत्या करणे शक्य नाही, घटनेतूनच त्याची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला आहे.
अनिलकुमार शर्मा याच्या देहावर कोणतीच जखम, त्याला मारहाण केल्याचे व्रण नाही, अशी प्राथमिक माहिती रोहा पोलिसांनी दिली. तरीही शर्मा हा विवाहित तरुण विचारात घेता घातपात आहे का? याचा तपास करीत आहोत असेही पोलिसांनी सांगितले. गुरुवारी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे अनिलकुमार शर्मा याचे पोस्टमार्टम करण्यात आले. आता पोस्टमार्टमधून अनिलकुमार शर्मा याची आत्महत्या की घातपात? हे समोर येईल. दरम्यान, अनिलकुमार शर्मा याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या भावाने केल्याने आत्महत्या की हत्या? हे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.अनिलकुमार शर्मा याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या भावाने के ल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.