मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 02:05 AM2024-05-03T02:05:46+5:302024-05-03T02:06:32+5:30
चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे.
मधुकर ठाकूर -
उरण : प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला मदत करणाऱ्या दिघोडे-उरण येथील चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या सोहेल इस्माईल खान (१९) या तरुणाला उरण पोलिसांनी अटक केली आहे.
चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे.मानखुर्द येथील घरकाम करणाऱ्या पुनम चंद्रकांत क्षिरसागर (२७) या अविवाहित महिलेचा विवाहित प्रियकर निझामउद्दीन अली (२८) यानेच तिचा टॅक्सीतच गळा दाबून खून केला.प्रेयसी पुनमचा मृतदेह त्याने टॅक्सीतूनच दिघोडे-उरण येथे आणला.
उरण परिसरात अधुनमधून टॅक्सीचे भाडे घेऊन आल्यावर निझामउद्दीन नेहमी आपल्या मुळ गावातल्या व सध्या दिघोडे नाक्यावर चायनीज फूडच्या टपरीवर काम करणाऱ्या सोहेलकडे खानपान करीत असायचा.त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची मदत घेण्याचे ठरवूनच तो मृतदेह टॅक्सीतून दिघोड्यापर्यत घेऊन आला होता. सोहेलही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तयार झाला. त्यानेच दाखविलेल्या चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून देऊन दोघांनी पळपोलिस तपासणीत पुनमच्या हत्येत त्याचा कोणताही सहभाग नसला तरी आरोपीला मृतदेहाची विल्हेवाटीसाठी मदत करणे, पुरावा नष्ट करणे, गुन्ह्याची माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली सोहेलला अटक करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.