अलिबाग - नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समिती, माणुसकी प्रतिष्ठान यांनी अमलीपदार्थ विरोधी जनजागृतीनिमित्त संकल्प नशामुक्तीचा, एक पाऊल नशामुक्तीच्या दिशेने’ या स्लोगनखाली प्रभात फेरीचे आलबागमध्ये आयोजन केले आहे. १४ फेब्रुवारीला सकाळी ७:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून ही फेरी निघणार आहे. अमली पदार्थाचे सेवन व दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
रॅलीचा मार्ग असा
जिल्हाधिकारी कार्यालय-पोलिस, पेट्रोलपंप-तांबोली हॉस्पिटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा एसटी स्टॅण्ड, मारुती नाका जिल्हाधिकारी कार्यालय, अशी रॅली काढण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स व निबंध स्पर्धा
रायगड जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस ठाणे स्तरावर ‘व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर्स स्पर्धा व अकरावी व बाराच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.