रोह्यात वणवाविरोधी जनजागृती अभियान
By admin | Published: March 28, 2016 02:18 AM2016-03-28T02:18:18+5:302016-03-28T02:18:18+5:30
रोह्यात जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र रोहा यांच्या वतीने वणवाविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त मोटारसायकल रॅली काढून पर्यावरणाबरोबर
धाटाव : रोह्यात जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र रोहा यांच्या वतीने वणवाविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त मोटारसायकल रॅली काढून पर्यावरणाबरोबर वनसंरक्षणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. या रॅलीचे गावोगावी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
वनदिनानिमित्त सकाळी ७.३० वा. रोहा वनपरिक्षेत्र कार्यालय याठिकाणी पेट्रोलिंगकरिता देण्यात आलेल्या चारचाकी व्हॅनचा वनपरिक्षेत्र अधिकारी उपाध्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
रोह्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयापासून निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे भुवनेश्वर, निवी, तळाघर, बोरघर, लांढर, वाशी, धाटाव, किल्ला, खांब, उडदवणे, कोलाड, कुंडली या भागात स्वागत करण्यात आले. जनजागृती अभियान मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून जलसंपत्तीची बचत करू, दुष्काळावर मात करू, पैशासारखे मोजू या पाणी, बचतीचा मंत्र घेऊ या कानी असे संदेश देण्यात आले. (वार्ताहर)