जेएनपीए ते दादरी दरम्यान रीफर्स कंटेनरसाठी एपीएम (मर्स्क) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 11:21 AM2023-08-19T11:21:43+5:302023-08-19T11:21:54+5:30

निर्यात रीफर कंटेनरसाठी ही पहिलीच समर्पित शेड्यूल रेल्वे सेवा 

APM (Maersk) to start weekly train service for reefer containers between JNPA and Dadri | जेएनपीए ते दादरी दरम्यान रीफर्स कंटेनरसाठी एपीएम (मर्स्क) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करणार

जेएनपीए ते दादरी दरम्यान रीफर्स कंटेनरसाठी एपीएम (मर्स्क) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करणार

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीएमध्ये असलेल्या खासगी एपीएम      ( मर्स्क ) न्हावा -शेवा बंदर ते उत्तर भारतातील दादरी दरम्यान रीफर्स कंटेनरसाठी साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करणार आहे. निर्यात रीफर कंटेनरसाठी ही पहिलीच समर्पित शेड्यूल रेल्वे सेवा असणार आहे.ही सेवा कंटेनर इन्व्हेंटरी वाटपापासून ते जहाजावर चढेपर्यंत अखंडित असणार असल्याची माहिती कंपनीचे दक्षिण आशियाचे प्रमुख प्रजेश रवींद्रनाथन यांनी दिली.

    वेगवान व्यवसायाच्या वातावरणात, ग्राहक एकात्मिक उपाय शोधत आहेत. जिथे ते एकाधिक विक्रेत्यांऐवजी एकाच विंडोशी व्यवहार करतात. 
“विशेषत: रीफर्समध्ये, रिकाम्या पिकअपपासून वेसल बोर्डिंगपर्यंत इन्व्हेंटरी व्यवस्थापन, ग्राहकांना अनेक टच पॉइंट्सपर्यंत पोहोचावे लागते. ग्राहकांना व्यवसाय करण्यास सुलभता देण्यासाठी आम्ही न्हावा-शेवा (जेएनपोर्ट ) ते दादरी दरम्यान उत्तर भारताशी निर्यातीसाठी जोडण्यासाठी समर्पित साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करत असल्याचे रवींद्रनाथन यांनी सांगितले.

  ही पहिलीच निर्यात रिफर समर्पित अनुसूचित रेल्वे सेवा असुन ही सेवा इन्व्हेंटरी वाटपापासून ते जहाज ऑनबोर्डिंगपर्यंत अखंडितपणे काम करणार आहे.
कोपनहेगन-आधारित एपीएम ( मर्स्क ) मर्स्क शिपिंग लाईन चालवते. ही जागतिक स्तरावरील तिसऱ्या क्रमांकावरील कंटेनर वाहकांपैकी एक शिपिंग लाईन आहे. ही साप्ताहिक रेल्वे सेवा एक्सपोर्ट रीफर कंटेनर्स जेएनपोर्टवर मर्स्कच्या एमई-२  सेवा कॉलिंगशी जोडली जाणार आहे.उत्तर प्रदेशातील दादरी हे पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसाठी एक रेल्वे हब आहे.जेएनपोर्ट पुढील वर्षी वेस्टर्न डीएफसीशी पूर्णपणे जोडले जाणार आहे.एक विकास ज्याची देशाच्या निर्यात-आयात व्यापाऱ्यांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. कारण ही सेवा डबल स्टॅक कंटेनर ट्रेन चालवण्यास मदतगार ठरणार असून यामुळे शिपर्सचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याचे कार्गो मालक वर्गाकडून सांगितले जात आहे.

Web Title: APM (Maersk) to start weekly train service for reefer containers between JNPA and Dadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.