"उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मांगो", पनवेलमध्ये भाजपची महाविकास आघाडीविरोधात निदर्शन
By वैभव गायकर | Published: October 21, 2023 05:28 PM2023-10-21T17:28:51+5:302023-10-21T17:29:50+5:30
पनवेल - राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या ...
पनवेल - राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महविकास आघाडीला दिला. दि. 21 रोजी पनवेलमध्ये महाविकास आघाडी विरोधात निदर्शन केली.
उद्धव ठाकरेंच्या रूपात अडीच वर्षे कंत्राटी पद्धतीने राज्याला मुख्यमंत्री मिळाला आणि ते पण फक्त फेसबुकवरच दिसायचे. लोकांना नाही भेटायचे पण शरद पवार यांना बरोबर भेटायचे. शिंदे सरकार कसे पाडले जाईल यासाठी महाविकास आघाडीचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मात्र आत्ताचे सरकार जनहितासाठी काम करणारे आणि भक्कम आहे, त्यामुळेच जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. शरद पवारांचा राजकीय खोटारडेपणा दिसून आल्याने त्यांच्या पासून त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते बाहेर पडले असल्याचा आरोप ठाकुर यांनी केला.पनवेल शहर व तालुका भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका अध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगतयांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.