- जयंत धुळपअलिबाग : शासनाच्या खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यात कुर्डूस ते मानकुळे या खाडीकिनारपट्टीत गेल्या ३२ वर्षांत संरक्षक बंधारे बांधले नाहीत. अस्तित्वात असलेल्या संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती केली नाही. परिणामी, खाडीकिनारच्या एकूण ३६ गावांतील पाच हजार ८३५ शेतकºयांचे गेल्या ३२ वर्षांत ४८३ कोटी ८९ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या ३२ वर्षांत तेथे शेतकºयांना अन्नधान्य पिकवताच आले नसल्याने सर्वप्रथम दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर नापीक झालेल्या भातशेती क्षेत्राचे सर्वेक्षण करून राज्याच्या सांख्यिकी विभागाला माहिती देण्यात यावी. सात हजार ५६१ एकर (तीन हजार १६ हेक्टर) भातशेती क्षेत्र जमीन नापीक करून भाताच्या उत्पादनाचे ४८३ कोटी ८९ लाख ६० हजार रुपयांच्या झालेल्या नुकसानाचा अहवाल शासनास पाठवून शेतकºयांना सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी दिले आहे.यावेळी आपत्तीकालीन उपाययोजनांची गरज असल्याने जिल्हाधिकाºयांनी खारेपाटास प्रत्यक्ष भेट द्यावी, अशीही मागणी केली आहे. खारेपाटात भात हे एकच पीक या जमिनीत घेता येते. येथील शेतकरी हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाण्याच्या आभावी दुसरे पीक घेऊ शकत नाहीत. अलिबागमधील कुर्डूस ते मानकुळे-रेवस या खारभूमी विभागातील ३६ खारभूमी योजनेअंतर्गत पाच हजार ८३५ शेतकºयांचे १९ हजार ३४ एकर भौगोलिक क्षेत्रापैकी सात हजार ५४१ एकर क्षेत्र खारभूमी विभागाने संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती न के ल्याने समुद्ररक्षक बंधारे फुटून १९८२पासून नापीक झाले आहेत. खारभूमी योजना शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर एकूण खारभूमी क्षेत्राच्या ५० टक्के भातशेती नापीक झाल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. शेतकºयांनी विकसित केलेल्या तंत्रानुसार खारभूमी क्षेत्रात दर एकराला प्रतिवर्षी ५२ शेतकºयांंना रोजगार प्राप्त होतो.खारेपाटात काही ठिकाणी भांडवलदराने ३० वर्षे अगोदरच खारभूमी विभागाच्या अधिकाºयांना हाताशी घेऊ न खारभूमी विभागाचे संरक्षक बंधारे न बांधता, शेती नापीक करून ती स्वस्त दरात कशी घेता येईल, याचे नियोजन करून, मानकुळे विभागात जमिनी खरेदीदेखील झाल्याचे दिसून येत असल्याचे नमूद केले आहे. नापीक भातशेती क्षेत्राची माहिती जिल्हा प्रशासनाला, सांख्यिकी विभागाला नसल्याने या सर्व नापीक खारभूमीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी २०१४ पासून श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. त्याचाच भाग म्हणून २ फेब्रुवारी २०१६ रोजी दौरा केला व यामध्ये ५० टक्के खारभूमीचे क्षेत्र नापीक असल्याचे निदर्शनास आल्याची नोंद अलिबाग तालुका कृषी अधिकारी यांच्या दप्तरी झाली; परंतु महसूल विभागाने ७/१२ वर नापिकी शेरा न दिल्याने जिल्हा सांख्यिकी विभागाकडे याची नोंद नाही. ५ डिसेंबर २०१५ ला जिल्हा नियोजित समितीच्या बैठकीत खारभूमी क्षेत्रातील नापीक शेतजमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देशित केले आहे; परंतु असे सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली नाहीच व दुष्काळदेखील जाहीर होऊ शकला नाही. याबाबत निवेदन जिल्हा समन्वयक राजन भगत, नंदन पाटील, प्रभाकर नारायण पाटील, हरिश्चंद्र गजानन भगत, अर्जुन तांगू भोईर, गंगाधर म्हात्रे आदी उपस्थित होते.समुद्राच्या उधाणामुळे भातशेतीची नुकसानी, नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करणे अपेक्षित समुद्राच्या उधाणाचे खारे पाणी घुसून झालेल्या नुकसानीचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये केला नसल्याने येथील शेतकºयांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.ही बाब जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या निदर्शनास श्रमिक मुक्ती दलाने आणल्यावर १२ जानेवारी २०१७ रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांनी समुद्राचे उधाण भातशेती नुकसानाची भरपाई देणे, याबाबींचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्याकरिता जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी पत्रान्वये कळवल्याचे नमूद करून त्या पत्राच्या प्रती जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आल्या आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेस घ्यावा. नियमात जरी बसत नसेल, तरीदेखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकºयांच्या वतीने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता, श्रमिक मुक्ती दलास संबंधित विषयाची मांडणी करण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.समुद्राच्या उधाणाच्या भरतीमुळे १९८५पासून बाधित भातशेती क्षेत्र१. बाधित गावे - ३६२. एकूण बाधित शेतकरी - ५ हजार ८३५३. एकूण भौगोलिक क्षेत्र (हेक्टर) - ७ हजार ६१४४. एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर) - ३ हजार ०१६५. बुडीत रोजगार मनुष्यबळ - ३ लाख ९९ हजार १६६६. ३२ वर्षांतील एकूण बुडीत रोजगार (रुपये) - ३ कोटी ९३ लाख १६ हजार ५५०७. ३२ वर्षांतील बुडीत भात उत्पादन (क्विंटल) - ४८ लाख ३८ हजार ९६०८. ३२ वर्षांतील बुडीत भात मूल्य(रुपये) - ४८३ कोटी ८९ लाख ६० हजार९. शेतातील माशांचे बुडीत उत्पादन(क्विंटल) - १ लाख ५१ हाजार २१८१०. ३२ वर्षांतील माशांचे बुडीत उत्पन्न (रु.) - १ कोटी ५१ लाख २१ हजार ७५०११. ३२ वर्षांतील एकूण नुकसान - ४८९ कोटी ३३ लाख ९८ हजार ३००खारेपाटात एक एकरास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे ५२ माणसांना प्राप्त होणारे रोजगाराचे टप्पेशेतकरी संख्या रोजगाराचे स्वरूप शेतकरी संख्या रोजगाराचे स्वरूप०५ संरक्षक बंधाºयांची बंदिस्ती ०४ आवटणी (लावणी) करण्यास०४ शेतीतील गवत बेणण्यास ०१ बंदिशीवर (जोलीवर)०१ लांबा काढण्यास ०२ पेरणी करण्यास०६ कापणी म्हणजेच लाणी करण्यास ०४ दाढ्या, राब करण्यास०४ बांधणी व साठवणी १५ मळणीस दहा भारे प्रमाणे व भात वाहणी०६ खौरा व शेतीचे बांध काढण्यास५ डिसेंबर २०१५ ला जिल्हा नियोजित समितीच्या बैठकीत खारभूमी क्षेत्रातील नापीक शेतजमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देशित केले आहे. नाही.परंतु असे सर्वेक्षण आजपर्यत झाले नाही. यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई मिळालीनाहीच व दुष्काळदेखील जाहीर होऊ शकलानाही.
३२ वर्षांत बांधलेच नाहीत संरक्षक बंधारे , जिल्हाधिका-यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:56 AM