पेण सरपंचपदासाठी ३९ उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:08 AM2018-05-13T06:08:24+5:302018-05-13T06:08:24+5:30
महल मिऱ्या डोंगर ग्रामपंचायत बिनविरोध होणाºया या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पेणमधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी श्निवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदाच्या आठ
पेण : महल मिऱ्या डोंगर ग्रामपंचायत बिनविरोध होणाºया या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पेणमधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी श्निवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदाच्या आठ जागांसाठी एकूण ३९ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ८४ जागाकरिता उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहे.
पेणमधील वडखळ ग्रा.प.मध्ये सरपंचपदासाठी सात उमेदवारी अर्ज, तर १५ जागांसाठी ६५ अर्ज, बोरी सरपंचपदासाठी चार अर्ज, तर नऊ जागांसाठी २० अर्ज, दिन सरपंचपदासाठी सात अर्ज तर नऊ जागांसाठी २८ अर्ज, तरणखोत सरपंचपदासाठी पाच अर्ज, तर ११ जागांसाठी २१ अर्ज, दुष्मी-खारवाडा सरपंचपदासाठी सात अर्ज, ११ जागांसाठी ४८ अर्ज, बळवली सरपंचपदासाठी पाच अर्ज, नऊ जागांसाठी २३ अर्ज, वाशी सरपंचपदासाठी तीन अर्ज, ११ जागांसाठी २८ अर्ज व महल मिºया डोंगर सरपंचपदासाठी एक अर्ज तर नऊ जागांसाठी नऊ उमेदवारी अर्ज असे एकूण सरपंचपदासाठी ३९ अर्ज तर ८४ जागांसाठी २४७ उमेदवारी अर्ज दाखल झालेत. महल मिºया ग्रा.पं.मध्ये सरपंचापदासाठी जर्नादन बुध्या भस्मा, सदस्यांच्या नऊ जागांकरिता अनुक्रमे महादेव माया उघडा, गणपत कमल्या पारधी, धानी कमलाकर भस्मा, देवकी धाया जाधव, हशा बामा ठाकरे, मनीषा जोमा सोनार, सुलभा लहू ठाकरे, मालू रेखा आघाडे, राजेश्री भरत शिंदे, हे नऊ जागांसाठी अर्ज आहेत. एका जागेसाठी एक अर्ज आल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ ग्रा.पं. सरपंच पदासाठी ३९ उमेदवारी अर्ज तर ८४ जागाकरिता २४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.