रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये १३१ उमेदवारांपैकी १९ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असल्याने ११२ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्यावर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी आक्षेप घेतला होता, तर घोसाळकर यांच्यावर अपक्ष उमेदवाराने हरकत घेतली होती. उरणमध्ये शेकापचे विवेक पाटील यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यावर हरकत घेतली होती, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच कालावधीसाठी दोन्ही समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण होते.
पनवेलमधून १३ उमेदवारी अर्ज वैधपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात २१ नामनिर्देशित अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. यापैकी १३ अर्ज वैध ठरले आहेत, तर उर्वरित आठ अर्ज विविध कारणामुळे बाद ठरविण्यात आले आहेत.वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये अरु ण म्हात्रे, फुलचंद कीटके, प्रशांत ठाकूर (भाजप), हरेश सुरेश केणी, संजय गणपत चौधरी, राजीव सिन्हा, कांतीलाल कडू, अरु ण कुंभार, प्रवीण पाटील, हरेश मनोहर केणी (शेकाप), बबन पाटील (अपक्ष) मानवेंद्र वैदू, गणेश कडू यांचा समावेश आहे. ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.महाडमध्ये तीन उमेदवार अपात्रदासगाव : महाड मतदारसंघात एकूण १९ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी शनिवारी झालेल्या छाननीत तीन उमेदवार बाद झाले. यात स्नेहल जगताप यांचे तीन अर्ज आणि जनता दलाचे मुद्दसीर पटेल आणि रोहित पारधे यांचा समावेश आहे.१९४ महाड विधानसभा मतदारसंघात १९ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माणिक जगताप आणि स्नेहल जगताप यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दिले होते. माणिक जगताप यांचा अर्ज वैध ठरल्याने स्नेहल जगताप यांचे अर्ज बाद झाले. शिवाय जनता दलाचे मुद्दसीर पटेल आणि रोहित पारधे यांनीही कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचा अर्जही बाद करण्यात आला आहे.यामुळे आता अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत तरी दहा उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. यामध्ये चंद्रकांत धोंडगे, विकास गोगावले, अशोक जंगले, गणेश नाकते, लक्ष्मण निंबाळकर, हे पाच अपक्ष उमेदवार आणि काँग्रेसकडून माणिक जगताप, भरत गोगावले-शिवसेना, देवेंद्र गायकवाड-मनसे, आशिष जाधव बहुजन मुक्ती पार्टी, संजय घाग वंचित बहुजन आघाडी, राजकीय पक्षाकडून पाच उमेदवार छाननीत कायम राहिले आहेत.अलिबागमध्ये पाच उमेदवारांचा पत्ता कटअलिबाग : विधानसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीमध्ये बाद झाले. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर, शिवसेनेकडून जुईली दळवी, काँग्रेसचे महेश ठाकूर, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले नितीन पाटील आणि ममता देवरुखकर यांचाही समावेश आहे. ३७ उमेदवारांनी दाखल केलेल्या ४२ उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. पैकी ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.श्रीवर्धनमध्ये २३ उमेदवारी अर्ज वैधश्रीवर्धन : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी एकूण २३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. शनिवारी अर्ज छाननीसाठी श्रीवर्धन निवडणूक निर्णय कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्यासमोर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचे वकील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आय काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अदिती तटकरे यांचे वकील यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.श्रीवर्धनमधून मुस्लीम महिला रिंगणातश्रीवर्धन : श्रीवर्धनमध्ये माणगाव तालुक्यातील नांदवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महेक फैसल पोपेरे या मुस्लीम समाजातील महिलेने शुक्रवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या वेळी मुस्लीम समाजातील महिलांबरोबरच बहुजन समाजातील महिला आवर्जून उपस्थित होत्या. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून २००९ व २०१४ मध्ये महेक पोपेरे यांचे पती फैसल अजीज पोपेरे यांनी निवडणूक लढविली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव महेक यांच्याकडे आहे.उरणमध्ये १२ उमेदवारी अर्ज वैधउरण : उरणमध्ये १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी एक अर्ज अवैध ठरला असून, १२ अर्ज वैध ठरले आहेत. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बादली यांनी खरी माहिती लपवल्याचा आरोप करीत शेकापचे विवेक पाटील यांनी हरकत घेतली आहे. मात्रही ती फेटाळल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.पेणमधील २४ पैकी १६ अर्ज ठरले वैधपेण : पेण मतदारसंघात १८ उमेदवारांचे २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासमोर अर्जाची छाननी झाली.यात १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ६ उमेदवारांचे प्रत्येकी २ अर्ज दाखल असल्याने त्यापैकी प्रत्येक एक याप्रमाणे ६ उमेदवारी अर्ज तसेच २ नॅशनल पार्टीच्या उमेदवारांचे प्रत्येकी दोन दोन अर्ज दाखल असल्याने त्यापैकी एक - एक असे दोन अर्ज मिळून एकूण ८ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. रवींद्र दगडू पाटील (भाजप), धैर्यशील मोहन पाटील (शेकाप), नंदा राजेंद्र म्हात्रे (काँग्रेस), बाळाराम शंकर गायकवाड (बहुजन समाज पार्टी), धनराज लक्ष्मण खैरे (बळीराजा पार्टी), नीलिमा धैर्यशील पाटील (शेकाप), रमेश गौरू पवार (वंचित बहुजन आघाडी), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महापार्टी), अमोद रामचंद्र मुंडे (अपक्ष), सुनीता गणेश पवार (अपक्ष), प्रीतम ललित पाटील (अपक्ष), मोहन रामचंद्र पाटील (अपक्ष), रवींद्र बाळाराम पाटील (अपक्ष) रवंींद्र रघुनाथ पाटील (अपक्ष), राम मंगळ्या घरत (अपक्ष), रोहिदास गोविंद गायकवाड (अपक्ष) यांचा समावेश आहे.