लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सोमवारी संपन्न झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये उद्योग व्यवसायांना परवाने वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.
पालिका क्षेत्रातील खारघर नोडमधील प्लॉट क्र.२२ सेक्टर नं.५ येथील आयुक्त निवासस्थानाबाहेरील परिसर विकसित करणे व परिसरात लँडस्केपिंग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेले १२ सार्वजनिक शौचालय पे अँड यूज तत्त्वावर देण्याबाबतही बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यावेळी बैठकीदरम्यान परवाना विभागाकडील व्यवसाय परवाने, हॉटेल व्यवसाय परवाने, नवीन कारखाने व उद्योगधंदे यांचे सर्वेक्षण, नोंदणीकरण, नूतनीकरण, दुकानावरील जाहिराती व परवाना संबंधीची अनुषंगिक कामे स्वारस्य अभिव्यक्ती पद्धतीने करून नवीन व्यवसाय परवाने देणे व नूतनीकरण याबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील सभेत त्याविषयी निर्णय घेतला जाईल, तसेच महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ब, प्रभाग क्र. ७ मधील रोडपाली स्मशानभूमी दुरुस्ती करणे, पालिका क्षेत्रातील जाहिरात धोरणेच्या कामी मे.अलवेज ॲडव्हटायझिंग एजन्सी वाशी, नवी मुंबई यांना मुदतवाढ देण्यास मान्यता मिळण्याबाबतही चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील १ भूस्तर साठवण टाकी व १८ जलकुंभांची दुरुस्ती करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर यांच्यासह स्थायी समिती सदस्य, महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त धैर्यशील जाधव, इतर अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नानासाहेब यांना श्रद्धांजलीमहाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती १ मार्च रोजी पालिकेमार्फत जयंती साजरी केली नसल्याने पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नानासाहेबांचा विसर पडल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्थायी समितीत केला.