शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जिल्ह्यासाठी २६५ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 2:38 AM

जिल्हा नियोजन समिती बैठक : पाणीपुरवठा योजनांच्या निधीला प्राधान्य देण्याचा निर्णय

अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीने २०१९-२०या वित्तीय वर्षासाठी २६५ कोटी ५ लाख रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास सोमवारी मान्यता दिली. विकास आराखड्याचे नियोजन करताना राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवायच्या पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या कामांसाठी केंद्राकडून मिळणाºया निधीला समायोजित निधीची अधिकाधिक तरतूद करण्यास प्राधान्य दिले असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत सदस्यांना सांगितले.

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याची टंचाई निर्माण होते. या टंचाईच्या निवारणार्थ राष्ट्रीय पेयजल योजना या केंद्राच्या योजनेतून जो निधी मिळतो त्यात जिल्हा हिस्सा म्हणून अधिकाधिक निधीची तरतूद ही समायोजित निधी म्हणून करावी, अशी सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी केली. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त पाणीपुरवठा योजनांची कामे करता यावीत यासाठी या आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वसाधारण योजनांसाठी १८४ कोटी १६ लाख रु पये, आदिवासी उपयोजनांसाठी ५५ कोटी ९५ लाख रु पये तर विशेष घटक योजनांसाठी २४ कोटी ९४ लाख रु पये असे एकूण २६५ कोटी ५ लाख रु पयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीस रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधानपरिषद सदस्य आ.बाळाराम पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे , जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवरच्गेल्या वर्षात जिल्ह्यात ५ कोटी रु पयांचा निधी शासनातर्फे कमी देण्यात आला होता. यंत्रणांच्या मागणीनुसार ४० कोटी रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे, असे एकूण ४५ कोटी रु पयांच्या जादा निधीची राज्यस्तरीय सभेत मागणी करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे. त्यादृष्टीने फेब्रुवारी महिनाअखेर निधी १०० टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही यंत्रणा प्रमुखांना यावेळी त्यांनी दिले.पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ कोटींची तरतूदच्पाणीपुरवठा योजनांना प्राधान्यक्र म देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून लहान गटाने मंजूर केलेल्या आराखड्यात अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा विकास आराखड्यात पाणीपुरवठा योजनांसाठी १३ कोटी रु पये नियतव्यय ठरविण्यात आला होता. तो आता २५ कोटी रु पयांनी वाढविण्यात आला असून आता पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड