कर्जत : रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीची विश्रामगृहे महिला बचत गटांना देण्याचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या मिळकतीची नोंदणी करण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून २०१६ मध्ये या सर्व मिळकती ताब्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सभेत अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी मांडलेल्या १९ कोटी खर्चाच्या पुरवणी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.रायगड जिल्हा परिषदेच्या १५ सप्टेंबरच्या तहकूब सर्वसाधारण सभेचे आयोजन माथेरान येथे करण्यात आले होते. अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य सर्वसाधारण सभेला होते, त्यामुळे सभेची सुरु वात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अभिवादनाने झाली. सर्वसाधारण सभेमध्ये अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी २०१५-१६ चा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात विशेष बाब म्हणजे महिला बालकल्याण आणि समाज कल्याण विभागासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली. महसुली तूट आणि अपेक्षित महसुली उत्पन्न यांची सांगड घालत पुरवणी १८.७३ कोटींचा अर्थसंकल्प सभापती चित्रा पाटील यांनी जाहीर केला. बाळ राऊळ आणि सूर्यकांत कालगुडे यांनी विरोधी पक्षाच्या वाट्याला निधी वाढवून देण्याची तसेच निधी जाहीर करण्याची मागणी केली. त्यावेळी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी वाढवून दिला जाईल असे आश्वासन दिले. प्रतोद शामकांत भोकरे यांनी जिल्ह्यातील अनेक खाड्या या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, त्यामुळे तेथे खाजगी लोकांना बोटिंगसाठी देण्याऐवजी जिल्हा परिषदेने पर्यटनाला चालना देण्यासाठी तेथे हाऊसबोट तसेच बोटिंग सुरु केल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी केली. सदस्य राजेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मिळकतींची नोंद जिल्हा परिषदेने करून घ्यावी अशी मागणी केली. यावेळी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते.शिक्षक अस्थायी असल्याची तक्र ारसदस्य तुकाराम कडू यांनी घारापुरी बेटावरील जिल्हा परिषदेचे शिक्षक अस्थायी असल्याची तक्र ार केली, त्यावेळी डिसेंबर अखेर कायमस्वरूपी शिक्षक दिला जाईल असे उत्तर शिक्षणाधिकारी बढे यांनी दिले. अनेक ग्रामपंचायतींच्या तक्र ारी असल्याने थेट आयुक्तांपर्यंत लोक जात आहेत. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी सदस्य आस्वाद पाटील यांनी केली. वैजनाथ ठाकूर यांनी आपल्या प्रभागात प्रशासनाकडून प्रस्ताव मंजूर केले जात नसल्याची तक्र ार केली.जानेवारीपासून सुधारित वेतनरायगड किल्ल्यावर काम करीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वर्ष झाले तरी पगारवाढ पोहचली नसल्याची तक्र ार सूर्यकांत कालगुडे आणि बाळ राऊळ यांनी केली. जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी जानेवारीपासून त्यांना सुधारित वेतन देण्यात येईल अशी माहिती दिली.राष्ट्रगीताची मागणीरायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांना दिली जाणारी पोलिसांची मानवंदना बंद झाल्याचा प्रश्न सदस्य उत्तम कोळंबे यांनी उपस्थित केला. कोळंबे यांनी ग्रामपंचायतींच्या सभांची सुरु वात राष्ट्रगीताने करण्याची मागणी केली.
१९ कोटींच्या पुरवणी अर्थसंकल्पास मंजुरी
By admin | Published: December 03, 2015 1:30 AM