अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तिसरा क्र मांक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:42 AM2019-04-01T04:42:17+5:302019-04-01T04:42:41+5:30

अमेरिकेतील मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा : प्रथम ब्राझील, द्वितीय क्रमांकावर मेक्सिको

Apurba Thakur of Alibaug won the World Championship in the third position | अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तिसरा क्र मांक

अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तिसरा क्र मांक

Next

अलिबाग : मिस टीन युनिव्हर्स २०१९ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना तिने या जागतिक स्पर्धेत तिसरा क्र मांक पटकाविला आहे. अमेरिका-पनामा येथे नुकतीच जागतिक सौंदर्य स्पर्धा पार पडली. प्रथम क्र मांकावर ब्राझील आणि द्वितीय क्र मांक मेक्सिकोचे स्पर्धक राहिले. भारताचे नाव प्रथम तीन क्र मांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वा ठाकूरवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये विविध २८ देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या २८ मधील १६ स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यानंतर सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अपूर्वा ठाकूर या दोन्ही विभागामधून अंतिम सहा स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फेऱ्यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा २०१९ चा मुकूट पटकावला. दुसऱ्या क्र मांकावर मेक्सिकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली तर तिसºया क्र मांकावर भारताच्या अपूर्वा प्रवीण ठाकूर हिची निवड करण्यात आली.
अपूर्वाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टीन इंडिया युनिव्हर्सचा किताब २०१८ साली जिंकला होता. मिस टीन युनिव्हर्स या जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले ही भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यानेच मला हे यश प्राप्त करता आले, असे अपूर्वाने सांगितले. अपूर्वा हिने तिला दिलेल्या पाठिंब्याबाबत प्रशिक्षक जसमीत कौर, ठाकूर कुटुंबीय यांच्यासह सर्व रायगडकरांचेही आभार मानले आहेत.

Web Title: Apurba Thakur of Alibaug won the World Championship in the third position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.