वर्गणी गोळा करणाऱ्यांना बसणार चाप

By admin | Published: July 28, 2016 03:48 AM2016-07-28T03:48:27+5:302016-07-28T03:48:27+5:30

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्यांवर धर्मदाय आयुक्तांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. वर्गणी गोळा करण्याआधी त्यांना

The arbitrator will be able to collect the subscriptions | वर्गणी गोळा करणाऱ्यांना बसणार चाप

वर्गणी गोळा करणाऱ्यांना बसणार चाप

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्यांवर धर्मदाय आयुक्तांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. वर्गणी गोळा करण्याआधी त्यांना आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्गणी गोळा करु न आपले खिसे भरणाऱ्यांना चांगलाच चाप लागणार असल्याचे बोलले जाते.
सार्वजनिक कार्यक्र म करताना वर्गणी मागण्याचे, गोळा करण्याचे फॅड जुनेच आहे. मंडळाच्या नावावर वर्गणी गोळा करून आपलाच खिसा भरण्याची सवय मंडळांमधील काही कार्यकर्त्यांची असते. वर्गणी गोळा करताना दमदाटी करण्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे वाद निर्माण होत असे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. अशा प्रवृत्तीमुळे काही सार्वजनिक मंडळे बदनाम झाली आहेत. यातून सुटका करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांनी कंबर कसली आहे. पारंपरिक पद्धतीची नोंदणी रद्द करून ती आॅनलाइन करण्यात आली आहे. यंदापासून ही आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी असलेल्या कागदोपत्री नोंदणीच्या माध्यमातून मंडळांना नोंदणीसाठी अधिक वेळ द्यावा लागत होता. शिवाय या प्रक्रियेत पारदर्शकता राहण्याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मंडळातील वर्गणी गोळा करण्याच्या पद्धतीवर अनेकदा ताशेरे ओढले जात होते. मंडळाच्या जमाखर्चावरून वाद झाल्याच्या घटनाही घडताना समोर आल्या होत्या.
येत्या गणेशोत्सवापासूनच या नवीन आॅनलाइन पद्धतीचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. चॅरिटी महाराष्ट्र या नावाने असलेल्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात १० आॅगस्टपासून या नोंदणीला सुरूवात होणार आहे.

१० आॅगस्टपासून नोंदणी
येत्या गणेशोत्सवापासूनच या नवीन आॅनलाइन पद्धतीचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. चॅरिटी महाराष्ट्र या नावाने असलेल्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात १० आॅगस्टपासून या नोंदणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी त्या दृष्टीने तयारी करणे आवश्यक आहे. यामुळे एकप्रकारे मंडळांवर नियंत्रणच आले आहे.

आॅनलाइन नोंदणीसाठी शपथपत्र आवश्यक
आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मंडळाचा गेल्या वर्षीचा लेखापरीक्षण अहवाल अथवा पाच हजारांच्या आत वर्गणी असल्यास शपथपत्र आवश्यक करण्यात आले आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी आॅनलाइन प्रक्रि या निर्णय सरकारने घेतल्याने अनेक सार्वजनिक मंडळांची गोची झाली आहे. यामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
श्रावण महिना ते नवरात्रोत्सव या कालावधीत दहीहंडी उत्सव, नारळ फोडी स्पर्धा, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, साखरचौथ गणेशोत्सव, विविध क्र ीडा स्पर्धा, या स्पर्धा घेण्यासाठी सार्वजनिक मंडळे वर्गणी गोळा करतात. पूर्वी साधे पावतीबुक, मंडळाचा रजिस्टर नंबर असला तरीही वर्गणी गोळा करता येत होती. त्याला चाप बसणार आहे.

मंडळातील वर्गणी गोळा करण्याच्या पद्धतीवर अनेकदा ताशेरे ओढले जात होते. मात्र या आॅनलाइन प्रक्रि या निर्णयामुळे पारदर्शकता येणार आहे.

आॅनलाइन नोंदणी केल्याने सर्वांनाच फायदा होणार आहे. वेळेची आणि पैशाची बचत होणार असल्याने सर्व मंडळे, संस्थांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. नोंदणी विनामूल्य आहे.
- डी. के. पाटील, सहायक धर्मदाय आयुक्त

Web Title: The arbitrator will be able to collect the subscriptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.